व्यायामशाळेमुळे संस्कृती व प्रकृती सुधारते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:42 AM2021-02-18T04:42:46+5:302021-02-18T04:42:46+5:30
मनगट चांगले असले तर मन शुद्ध बनते, पर्यायाने जीवन समृद्ध बनते. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी. व्यायामामुळे प्रकृती ठणठणीत ...
मनगट चांगले असले तर मन शुद्ध बनते, पर्यायाने जीवन समृद्ध बनते. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी. व्यायामामुळे प्रकृती ठणठणीत राहते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी केले. उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील (तात्या), जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पी. जी. शिंदे, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, पंचायत समिती गगनबावडा उपसभापती पांडुरंग भोसले, इनसाईड ड्रीमचे संस्थापक मधुकर पोतदार, विनायक पोतदार, ऑलिम्पिया हेल्थ क्लबचे संस्थापक राजू कवाळे, वसंत कवाळे, ॲड. दत्ताजी कवाळे, आर. डी. वाघरे, बापू वाघरे, पांडुरंग खाडे, रवींद्र सातपुते, महेश पाटील, विनायक पाटील, सागर पाटील, बाबासोा भोसले, आनंदा पाटील, राम सोनार यांच्यासह कार्यकर्ते व युवावर्ग उपस्थित होता.