Kolhapur: चिक्कीमध्ये सापडले केस, प्लास्टिक; माणगाव येथे ग्राहक केंद्रावर प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 04:01 PM2024-09-03T16:01:58+5:302024-09-03T16:05:05+5:30
या उद्योग समूहाच्या पदार्थांची तपासणी करण्याची नागरिकांमधून मागणी
रूकडी/माणगाव : हातकणंगले तालुक्यातील एका उद्योग समूहाच्या शेंगदाणा चिक्कीमध्ये केस आढळून आले. यापूर्वीही यामध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळले होते. माणगाव येथील विक्री केंद्रामध्ये हा प्रकार समोर आला.
माणगाव येथील एका बेकरी ग्राहक केंद्रावरवर नामांकित संस्थेचे चिक्की अरूण भोकरे यांनी खरेदी केले. चिक्की खात असताना त्यामध्ये त्यांना केस आढळून आले. संबधित दुकानदाराला याबाबत जाब विचारला असता तो जबाबदारी झटकत होता.
यापूर्वी सतिश पाटील यांना प्लास्टिकचे तुकडे आढळून आले होते. एका समूहाच्या पदार्थांमध्ये आरोग्यास धोका होणार घटक आढळत असल्याने त्यांच्या उत्पादित पदार्थांवर संशय निर्माण होत आहे. या उद्योग समूहाच्या पदार्थांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.