अन्ननलिकेत अडकली केसांत घालायची पिन, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सात वर्षाच्या बालिकेला मिळाले जीवदान

By संदीप आडनाईक | Published: October 6, 2022 04:22 PM2022-10-06T16:22:04+5:302022-10-06T16:22:33+5:30

दोन दिवस ती अन्ननलिकेत अडकून पडल्यामुळे अन्ननलिकेला छिद्र पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.

Hairpin stuck in esophagus, seven year old girl saved after successful surgery in cpr hospital kolhapur | अन्ननलिकेत अडकली केसांत घालायची पिन, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सात वर्षाच्या बालिकेला मिळाले जीवदान

अन्ननलिकेत अडकली केसांत घालायची पिन, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सात वर्षाच्या बालिकेला मिळाले जीवदान

googlenewsNext

कोल्हापूर : बालिकेचे वय वर्षे अवघे सात. दोन दिवसांपूर्वी गिळताना त्रास होत असल्याने तिने आक्रोश मांडला होता. तिचे हाल पाहून आई-वडिलांनी तिला मंगळवारी (दि.४) मध्यरात्री सीपीआरमध्ये आणले. तिच्या छातीचा तसेच मानेची क्ष-किरण तपासणी केली असता तिच्या अन्ननलिकेत केसांत घालायची पिन अडकल्याचे दिसून आले. संभाव्य धोके लक्षात घेउन डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. भूल देऊन दुर्बिणीद्वारे त्याच पहाटे शस्त्रक्रिया करुन अन्ननलिकेत अडकलेली ही केसांची पिन काढली आणि या बालिकेला जीवदान दिले. शस्त्रक्रियेनंतर काल, बुधवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला. तिची प्रकृती उत्तम असल्याचा निर्वाळा डॉक्टर लोकरे यांनी दिला.

पन्हाळा तालुक्यातील गरीब कुटूंबातील या बालिकेचे आई-वडील तिला मंगळवारी रात्री दोन वाजता सीपीआर मध्ये घेऊन आले. तिने दोन दिवसांपूर्वी केसांची ही पिन गिळली होती. तिच्या लक्षणांवरुन डॉक्टरांनी तिच्या छातीची तसेच मानेची एक्स-रे (क्ष-किरण) तपासणी केली, तेव्हा ती पिन अन्ननलिकेत अडकल्याचे आढळले. रुग्णांच्या नातेवाईकांनी या शस्त्रक्रियेची माहिती, तसेच संभाव्य धोके यांची कल्पना देउन पहाटे २.४५ वाजता राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय) येथे हिरण्यकेशी इमारतीत कान, नाक, घसाशास्त्र विभागात दाखल केले.

मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भूल देउन दुर्बिणीद्वारे ही पिन काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. यासाठी कान, नाक, घसाशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अजित लोकरे, सहयोगी प्राध्यापक तदर्थ डॉ. वासंती पाटील आणि त्यांच्या टीमने परिश्रम घेतले. त्यांना अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरिष कांबळे, भूलतज्ज्ञ डॉ. प्रदीप रावत यांनी सहकार्य केले.

दीड सेंटीमीटर होती पिन

या बालिकेच्या अन्ननलिकेत अडकलेल्या या केसांच्या पिनेची लांबी साधारण १.५ सेंटीमीटर होती. दोन दिवस ती अन्ननलिकेत अडकून पडल्यामुळे अन्ननलिकेला छिद्र पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. परंतु वेळीच अचून निदान झाल्यामुळे हे संभाव्य धोके टाळण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले. ही अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी कुशलपणे पार पाडली.

Web Title: Hairpin stuck in esophagus, seven year old girl saved after successful surgery in cpr hospital kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.