हळदीच्या सरपंचासह अठराजणांना अटक
By Admin | Published: September 25, 2014 12:13 AM2014-09-25T00:13:14+5:302014-09-25T00:20:14+5:30
कायद्याचा बडगा : जुनी गाव चावडी पाडल्याचे प्रकरण
बीड : जालना न्यायालयाने लाच प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास पुन्हा लाच स्वीकारताना बीडमध्ये लाच लुचपत विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. शिक्षा झाल्यामुळे त्या कर्मचाऱ्यास खात्यातून कायमस्वरुपी काढुन टाकण्या ऐवजी तो शासकीय सेवेत कायम राहिला. त्याची बदलीही झाली अन् तो बीड येथे बुधवारी पुन्हा लाच घेताना पकडला. त्यामुळे या कर्मचाऱ्यास शासन निर्णय डावलुन अभय मिळालेच कसे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दादासाहेब दगडु मोरे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहे. सेवा निवृत्तीनंतर मिळणारे भविष्य निर्वाह निधीचे बील तयार करुन मंजुरीसाठी सादर करणेकरीता मोरे याने तक्रारदार राजाराम ऊंबरे यांच्याकडे तीन हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदार मोरे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधुन याबाबत तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी पंचासमक्ष लाच मागणी बाबत पडताळणी केली असता मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे भविष्य निर्वाह निधीचे बील तयार करुन मंजूरीसाठी सादर करण्याकरीता तडजोडीअंती २ हजार ५०० रुपयांची मागणी केली.
त्यावरुन बुधवारी मोरे यांच्या विरुद्ध लाचेचा सापळा रचला असता दादासाहेब मोरे याने २ हजार ५०० रुपयांची लाच रक्कम स्विकारताना सार्वजनिक बांधकाम विभाग बीड मधील आस्थापा शाखेमध्ये दुपारी दीड वाजता पकडले. त्याच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हरीष खेडकर म्हणाले, दादासाहेब दगडु मोरे यास २००४ मध्ये जालना येथे १५०० रुपांची लाच स्विकारताना पकडले होते. या प्रकरणी मोरे यास जालना जिल्हा न्यायालयाने लाच स्वीकारल्या प्रकरणी २००७ मध्ये एक वर्षाची शिक्षा व चार हजार रुपये दंड सुनावला होता.