१८ एकर शेती घोड्यांच्या साथीने कसणारा हालेवाडीकरांचा जाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:30+5:302021-07-17T04:20:30+5:30

उत्तूर : हौसेला नवल नाही, घोडे फक्त धावू शकतात असे नाही. त्यांनी मनात आणलं तर काही करू शकतात. ...

Halewadikar's net of 18 acres of farmland with horses! | १८ एकर शेती घोड्यांच्या साथीने कसणारा हालेवाडीकरांचा जाली!

१८ एकर शेती घोड्यांच्या साथीने कसणारा हालेवाडीकरांचा जाली!

Next

उत्तूर : हौसेला नवल नाही, घोडे फक्त धावू शकतात असे नाही. त्यांनी मनात आणलं तर काही करू शकतात. गेली १८ वर्षे १८ एकर शेतीची बारमाही कामे घोड्याच्या साहाय्याने करणाऱ्या हालेवाडी, (ता. आजरा) येथील जालिंदर दत्तू ऱ्हाटवळ यांची शेती करण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेले हालेवाडी गावाचे जालिंदर ऱ्हाटवळ यांना जंगलात जाताना बेवारस घोडा सात वर्षांपूर्वी सापडला. मौठ्या हौसेने त्याचे ‘छगन’ असे नामकरण केले. घोडे मालकाची पंचक्रोशीत शोधाशोध केली. मात्र, मालकच सापडला नाही. शेवटी त्यांनी घरी आणला. जालिंदर हे शेतात राहत असल्याने त्यावेळी पाण्याची टंचाई जाणवत होती. पाणी आणण्यासाठी घोड्याचा वापर होऊ लागला. कालांतराने घरातील म्हशीसोबत त्याचा शेतातील मशागतीसाठी वापर सुरू केला. पण घोड्याला वेग असल्याने म्हशीला मशागत करताना अडचणी येऊ लागल्याने छगनच्या जोडीला दुसरा घोडा आणला. सुरुवातीस छोट्या कामांना घोड्यांना जुंपण्यात आले. शेतीची कामे होऊ लागल्याने नांगरणी, कुळव, पाटे, रोप लावण, कोळपणी, वाहतूक आदी कामांसाठी बारमाही वापर होऊ लागला. बैलांपेक्षा लवकर शेतीची मशागत होते. कामही चांगले होते. त्यामुळे १८ एकर शेतीची मशागत घोडी करत असतात. अडीअडचणीत घोड्याच्या पाठीवरून सामानाची ने-आण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

यांत्रिकीकरण व अपुऱ्या असणाऱ्या बैलजोड्यांमुळे ऱ्हाटवळ यांनी घोड्यांना चांगले वळण लावले. सहजरीत्या ते शेतीची कामे करू शकतात हे ऱ्हाटवळ यांनी करून दाखविले. दोन तासात न थांबता दिवसभराचे काम करतात. तसा आहारही त्यांना दिला जातो. मात्र बैलासारखा खर्च आहाराचा येत नाही.

-

चौकट :

छगन-हरण जीवनसाथी

छगनच्या जोडीला बारा घोडे बदलले पण छगनने हार कधीही पत्करली नाही. त्याच्या जोडीला हरण नावाचा घोडा आणला आहे. दोन्ही आमचे जीवनसाथी असल्याने आमच्या कुटुंबाचे आर्थिक जीवनमान उंचावले. चलाख माणूसच घोड्याच्या साहाय्याने शेती करू शकतो.

- जालिंदर ऱ्हाटवळ -----------------------

फोटो ओळी : हालेवाडी (ता. आजरा) येथे घोड्याच्या साहाय्याने रोप लावणीसाठी चिखल करताना जालिंदर ऱ्हाटवळ. क्रमांक : १६०७२०२१-गड-०१

Web Title: Halewadikar's net of 18 acres of farmland with horses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.