कोडोलीत कोरोना रूग्णांचे अर्धशतक तर तीन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 07:40 PM2020-08-08T19:40:57+5:302020-08-08T19:41:58+5:30
कोडोली ता. पन्हाळा येथील कोरोना पॉझीटीव्ह रूग्णाची संख्या शनिवारी तीनने वाढल्याने एकूण रूग्णाची संख्या ५० वर पोहचली आहे. आजपर्यन्त एका महिलेसह तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
कोडोली - कोडोली ता. पन्हाळा येथील कोरोना पॉझीटीव्ह रूग्णाची संख्या शनिवारी तीनने वाढल्याने एकूण रूग्णाची संख्या ५० वर पोहचली आहे. आजपर्यन्त एका महिलेसह तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयातील ठेकेदार हा दि. २३ जुलै रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला.त्यानंतर ही संख्या वाढत गेलेली आहे काही व्यक्तींचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबीत आहेत. एका महिलेसह तिघांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे यामध्ये कोव्हिड केंद्रात एकाचा मृत्यू झाला. तर दुदैवाने निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या एकाचा क्वॉरटाईन कक्षात मृत्यू झाला आहे.
वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने दि ७ पासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लागू केला होता. व्यापाऱ्याची मागणी विचारात घेता पुन्हा हा कालावधी कमी केला असून तो तीन दिवसाचा केला. त्यामुळे रविवार दि १० पासून सर्व व्यवहार पुर्ववत सुरू राहतील असे पत्रक ग्रामपंचायतीच्या वतीने शंकर पाटील यांनी प्रसिध्द केले आहे.
संस्थात्मक अलगीकरण कक्ष बंद ....
कोडोली येथील जयंत आयआयटी इमारतीमध्ये सुरु असलेल्या संस्थात्मक अलगीकरण कक्षाच्या ठिकाणी कोव्हिड हॉस्पिटल सुरू होणार असल्याने हा कक्ष बंद करण्यात आला आहे.