मराठा समाजाच्यावतीने अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:27 AM2021-05-07T04:27:16+5:302021-05-07T04:27:16+5:30
गारगोटी : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी गारगोटी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आज गुरुवारी अर्धनग्न ...
गारगोटी :
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी गारगोटी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आज गुरुवारी अर्धनग्न होत निषेध व्यक्त करण्यात आला. याविरोधात लवकरच मोर्चा काढण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने योग्य ती उपाययोजना न केल्याने सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण रद्द झाले आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी गारगोटी येथे तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, भाजप विद्यार्थी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पार्थ सावंत, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, कॉम्रेड सम्राट मोरे, संदीप पाटील, सचिन भांदीगरे, सतीश जाधव, राहुल चौगले, शरद मोरे, अनिल देसाई आदी उपस्थित होते.
०६ गारगोटी आंदोलन
फोटो ओळ
सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामध्ये नंदकुमार शिंदे,प्रवीणसिंह सावंत,संदीप पाटील,सचिन भांदीगरे,सम्राट मोरे आदी.