नारळ दुकातून दीड लाखाची रोकड लंपास; लक्ष्मीपुरीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 06:18 PM2019-07-01T18:18:48+5:302019-07-01T18:21:53+5:30

दुकानासमोर पाच रुपयांचे क्वाइॅन पडले आहे असे सांगून दोघा अल्पवयीन मुलांनी लक्ष्मीपुरी येथील नारळ व्यापाऱ्याच्या दुकानातील दीड लाखाची रोकड भर दिवसा लांबवली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. सदाशिव शेट्टे (वय ७५ रा. कराड) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहेत.

Half a penny of cash from coconut duck | नारळ दुकातून दीड लाखाची रोकड लंपास; लक्ष्मीपुरीतील प्रकार

नारळ दुकातून दीड लाखाची रोकड लंपास; लक्ष्मीपुरीतील प्रकार

Next
ठळक मुद्देनारळ दुकातून दीड लाखाची रोकड लंपासभरदिवसा दोघा अल्पवयीन मुलांचे कृत्य

कोल्हापूर : दुकानासमोर पाच रुपयांचे क्वाइॅन पडले आहे असे सांगून दोघा अल्पवयीन मुलांनी लक्ष्मीपुरी येथील नारळ व्यापाऱ्याच्या दुकानातील दीड लाखाची रोकड भर दिवसा लांबवली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. सदाशिव शेट्टे (वय ७५ रा. कराड) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहेत.

अधिक माहिती अशी, कराड (जि. सातारा) येथील नारळ व मसाल्यांचे व्यापारी सदाशिव शेट्टे (वय ७५) यांचे लक्ष्मीपुरी परिसरात सचिन ट्रेडर्स नावाचे होलसेल नारळ विक्रीचे दुकान आहे. त्यांचा मुलगा सचिन हा दूकान चालवतो. तो बाहेरगावी गेल्याने सोमवारी दुकानात ते थांबले होते. रविवारी कोकणातील व्यापाऱ्यांकडून वसुल करून आणलेली दीड लाखांची रोखड त्यांनी दुकानातील गल्यामध्ये ठेवली होती. कुलप लावून चावी समोरच ठेवून ते दरात बसले होते. त्यांचा कामगार उत्तम तोडकर हा काही कामानिमित्त बाहेर गेला होता.

दुपारी साडेबाराच्या सुमारास १४ व १६ वर्षाचे दोघे मुले त्यांच्या दुकानात आली. नारळाचे दर विचारत शेट्टे यांना बोलण्यात व्यस्त ठेवले. यावेळी दूसऱ्या मुलाने पाठीमागून दुकानात प्रवेश केला. समोर बोलत थांबलेल्या मुलाने माझे पाच रुपये पडले आहेत शोधून द्या, असे म्हणुन त्यांना यडबडून ठेवले. पाठिमागून दूकानात घुसलेल्या मुलाने गल्ल्यातील दीड लाखाची रोकड लंपास केली. त्यानंतर शेट्टे यांच्या समोर उभा असलेला मुलगाही निघून गेला.

काही वेळाने कामगार दूकानात आला. त्याने गल्ला उघडला असता पैसे नसल्याचे दिसून आले. हा प्रकार ऐकून शेट्टे यांनाही धक्का बसला. त्यांनी हाकेच्या अंतरावरील लक्ष्मीपूरी पोलीसांना फोनवरुन माहिती दिली. पोलीस निरीक्षक वसंत बाबर पथकासह दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. स्थानिक सराईत अल्पवयीन चोरटे असण्याची शक्यता असलेचे पोलीसांनी सांगितले.
 

 

Web Title: Half a penny of cash from coconut duck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.