अर्धे शटर उघडे, दारात बसून व्यापार, शहरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 03:17 PM2021-07-12T15:17:38+5:302021-07-12T15:19:35+5:30

CoronaVirus In Kolhapur : सरकारने सरसकट दुकाने उघडण्यावरील निर्बंध कायम राखल्याने सोमवारी शहरातील दुकानदारांनी अर्धे शटर उघडे ठेवत दारात बसून व्यापार चालू ठेवला. राजारामपुरीतील अपवाद वगळता प्रशासनानेही व्यापक आणि कडक कारवाई न करता दुकानदारांना सहकार्याची भूमिका घेतल्याचे दिसत होते. यामुळे दुकानदारांना अर्धे शटर उघडून व्यापार करण्याची मुभा मिळाली.

Half shutter open, door to door trade, city picture, | अर्धे शटर उघडे, दारात बसून व्यापार, शहरातील चित्र

अर्धे शटर उघडे, दारात बसून व्यापार, शहरातील चित्र

Next
ठळक मुद्दे अर्धे शटर उघडे, दारात बसून व्यापार, शहरातील चित्रराजारामपुरी व्यापाऱ्यांची निदर्शने

कोल्हापूर : सरकारने सरसकट दुकाने उघडण्यावरील निर्बंध कायम राखल्याने सोमवारी शहरातील दुकानदारांनी अर्धे शटर उघडे ठेवत दारात बसून व्यापार चालू ठेवला. राजारामपुरीतील अपवाद वगळता प्रशासनानेही व्यापक आणि कडक कारवाई न करता दुकानदारांना सहकार्याची भूमिका घेतल्याचे दिसत होते. यामुळे दुकानदारांना अर्धे शटर उघडून व्यापार करण्याची मुभा मिळाली.

दरम्यान, राजारामपुरी येथील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनी विरोध केला. या वेळी व्यापारी आणि प्रशासन आमने-सामने आले. व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करून नाराजी व्यक्त केली.

शहरातील महाद्वार रोड, बिंदू चौक परिसर, सुभाष रोड, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरीतील आदी बाजारपेठेतील सरसकट दुकाने अर्धे शटर उघडून व्यवहार पूर्ववत ठेवण्याचा प्रयत्न केला. दुकानासमोर कामगार थांबवून व्यापार केला.

महापालिकेचे पथक महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी अशा ठिकाणी फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. या पथकाचे वाहन आल्यानंतर शटर बंद केले जात होते. ते गेल्यानंतर अर्धे शटर उघडून व्यवहार केले जात होते. शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठेत असे चित्र राहिले.

तीन महिन्यांपासून दुकाने बंद राहिल्याने व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दुकानातील कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आल्याने ते विविध मार्गाने व्यवहार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. समोरच्या बाजूचे अर्धे शटर उघडून तर मागील बाजूस दरवाजा असल्यास तेथून व्यापार केला जात होता.

दरम्यान, सकाळी दहा वाजता राजारामपुरीतील व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. यास पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला. दुकानदार आणि पोलीस, कर्मचारी आमने-सामने आले. दुकानदारांनी प्रशासनाच्या विरोधात राजारामपुरीतील मेन रोडवरील बिझनेस हाऊस येथील कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

निदर्शनात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, प्रशांत पोकळे, दीपक पुरोहित, श्याम बासरणी, अनिल पिंजारी, विजय येवले, मनोज शहा, राजू जोशी, भरत रावळ, प्रफुल राठोड आदी व्यापारी सहभागी झाले होते.
 

Web Title: Half shutter open, door to door trade, city picture,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.