हलकर्णी वीज वितरण डीपीतील फ्युजा काढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:01+5:302021-04-24T04:24:01+5:30
हलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील मराठी शाळेजवळ व टेलिफोन ऑफिसजवळ असणाऱ्या मुख्य डीपीतील पेटी उघडून डीपीतील फ्युजा काढून ...
हलकर्णी :
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील मराठी शाळेजवळ व टेलिफोन ऑफिसजवळ असणाऱ्या मुख्य डीपीतील पेटी उघडून डीपीतील फ्युजा काढून टाकून वीज पुरवठा बंद पाडण्याचा प्रकार गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे.
अज्ञाताकडून केवळ फ्युजा काढून बाजूला ठेवण्यात येत आहेत. यामध्ये चोरीचा प्रकार होत नसला, तरी हलकर्णी गावासह अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन संबंधित डीपीला जोडले आहेत. मात्र, सतत फ्युजा काढण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात मोठा व्यत्यय येत आहे.
गावाबाहेरील पीर मॉसाबी दर्ग्याजवळील गावाला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य 'एबी' वाहिनीचाही स्वीच रात्री-अपरात्री बंद करणे, आदी प्रकार सुरू आहेत. या दोन्ही डीपी व मुख्य वाहिनी धोकादायक आहेत. त्यामुळे काढलेल्या फ्युजा व स्पीच सुरू करताना जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच अचानक वीज पुरवठा खंडित व सुरू झाल्यामुळे वीजजोडणीमध्ये अथवा डीपीमध्ये स्फोट होण्याची शक्यता आहे. या प्रकाराला कंटाळून वीजवितरणचे हलकर्णी शाखेचे कनिष्ट अभियंता यांनी हलकर्णी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
---------------------
फोटो ओळी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील मराठी शाळेजवळील मुख्य डीपीमधील फ्युजा अज्ञातांनी अशा काढून बाजूला टाकल्या आहेत.
क्रमांक : २३०४२०२१-गड-०६