हाळवणकर यांनाच सत्तेची मस्ती

By admin | Published: May 31, 2016 01:13 AM2016-05-31T01:13:59+5:302016-05-31T01:18:56+5:30

मुश्रीफ यांचा पलटवार : चिकोत्रा खोऱ्यात माझ्यामुळेच समृद्धी

Halvankar is the only person to enjoy power | हाळवणकर यांनाच सत्तेची मस्ती

हाळवणकर यांनाच सत्तेची मस्ती

Next

कोल्हापूर : भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांना सत्तेची मस्ती आली आहे. मी काहीच करणार नाही, परंतु माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर टीका करण्याचे परिणाम म्हणून नियती व परमेश्वरच त्यांना धडा शिकवेल. त्यांचा घडा भरत आला आहे. ‘भगवान के दरबार मे देर हैं, लेकीन अंधेर नहीं...’ असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकातून केला.रविवारी तमनाकवाडा (ता. कागल) येथील पाणी परिषदेत आमदार हाळवणकर यांनी मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्याला मुश्रीफ यांनी प्रत्युतर दिले आहे.
मुश्रीफ म्हणतात, ‘ मेरे अंगने में तेरा क्या काम हैं..?’ हे वाक्य माझ्या पत्रकामध्ये नव्हतेच, परंतु लोकांचा माझ्यावर रोश आहे म्हणून स्वत:च्या मतदारसंघामध्ये सर्व आलबेल आहे, असे हाळवणकर यांनी समजू
नये. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीकरांचा आक्रोश त्यांना दिसेलच. त्यानंतरच त्यावर भाष्य करेन.
पत्रकात पुढे म्हटले आहे, ‘मी १९९९ मध्ये आमदार झालो तेव्हा चिकोत्रा प्रकल्प रखडला होता. पहिल्याच वर्षी भरीव निधी प्राप्त करून दिला. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. २००१ मध्ये तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांच्या हस्ते कापशी येथे जलपूजन केले.
चिकोत्रा खोऱ्यामधील समृद्धी खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून चालू झाली. चिकोत्रा खोऱ्यामध्येच सरसेनापती संताजी घोरपडे या शूरवीर मराठी सेनापतीच्या नावे साखर कारखाना काढून जिवंत स्मारक तर केलेच, त्याशिवाय कापशी येथे संताजी घोरपडे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचे काम सुरू करून चिकोत्रा खोऱ्याचा सन्मान केला. कागल विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामांचा डोंगर उभा
केलाच शिवाय क्षणभरही न थकता लोकांच्यासाठी धावून जाणारा कार्यकर्ता बनलो
लोकप्रतिनिधी हा कुटुंबप्रमुख असतो. कुणालाही ठेच लागली तर त्याची कळ मला येते असे नाते जपण्याचा प्रयन्त केला आहे. म्हणून माझ्यासारख्या आधुनिक मदारी म्हेत्तरला सलग चारवेळा निवडून देण्याची किमया मायबाप जनतेने केली आहे.
कागल मतदारसंघ विकासाचे मॉडेल बनवण्यात मला यश
आले आहे; परंतु मला कधीही सत्तेची मस्ती आली नाही. जनतेचा सेवक म्हणून काम केले आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Halvankar is the only person to enjoy power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.