‘हमिदवाडा’चा साखर उतारा विभागात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:20 AM2020-12-26T04:20:32+5:302020-12-26T04:20:32+5:30
म्हाकवे : चालू गळीत हंगामात गााळप झालेल्या उसाला सरासरी ११.८७ इतका उच्चांकी साखर उतारा मिळाला असून आपल्या कारखान्याने ...
म्हाकवे : चालू गळीत हंगामात गााळप झालेल्या उसाला सरासरी ११.८७ इतका उच्चांकी साखर उतारा मिळाला असून आपल्या कारखान्याने उच्चांकी साखर उताऱ्याची परंपरा कायम ठेवली आहे. साखर उताऱ्यात आपला कारखाना विभागात अव्वल ठरल्याचे सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले. हमिदवाडा कारखान्याच्या उत्पादित २ लाख ५१ हजार क्विंटल साखर पोत्याचे पूजन संचालक मंडळाच्या उपस्थितीत मंडलिक यांच्या हस्ते झाले.
७ लाख टन गाळपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संचालक, शेतकरी, कर्मचारी, वाहतूकदार सर्वांचेच सहकार्य लाभत आहे तसेच ४ हजार क्षमता असतानाही प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे दररोज ५ हजार टन गाळप होत आहे. याबाबत मंडलिक यांनी कारखाना प्रशासनाचे अभिनंदन केले.
यावेळी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले,संचालक बापूसोा भोसले-पाटील, शिवाजीराव इंगळे, आनंदा मोरे, मारुती काळुगडे, मसू पाटील, धनाजी बाचणकर, कैलाससिंह जाधव, दत्तात्रय चौगुले, वीरेंद्र मंडलिक, शहाजी यादव, चित्रगुप्त प्रभावळकर, सौ. नंदिनीदेवी घोरपडे, सौ. राजश्री चौगुले, प्रकाश पाटील, प्रदीप चव्हाण, सर्जेराव पाटील, एन. वाय. पाटील उपस्थित होते.
चौकट-
डिस्टलरी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
मंडलिक सहवीजमधून १ कोटी ४० लाख ९८ हजार ३६० युनिट वीजनिर्मिती झाली आहे. नोव्हेंबरअखेर आलेल्या उसाला प्रतिटन (२८६६ रु.) एफ.आर.पी.प्रमाणे १९ कोटी ५२ लाख ३१ हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांचे नावे जमा केली आहे तसेच, डिस्टलरी प्रकल्पाचेही काम अंतिम टप्प्यात आले असल्याचेही मंडलिक यांनी सांगितले.
कँप्शन
हमिदवाडा येथे कारखान्याच्या साखर पोत्याचे पूजन करताना खासदार संजय मंडलिक यावेळी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले व संचालक
(छाया : जे. के. फोटो, सुरूपली)