हातकणंगलेतील हाणामारी व्हॉट्स अॅप मेसेजवरून - :शिक्षक-लिपिक राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:07 AM2019-05-18T01:07:37+5:302019-05-18T01:09:16+5:30
: हातकणंगले पंचायत समितीमध्ये शिक्षक आणि लिपिक यांच्यात झालेल्या हाणामारीमागे त्याआधी व्हॉट्स अॅपवर टाकलेले मेसेज कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हॉट्स अॅप मेसेजवरून सुरू
कोल्हापूर : हातकणंगले पंचायत समितीमध्ये शिक्षक आणि लिपिक यांच्यात झालेल्या हाणामारीमागे त्याआधी व्हॉट्स अॅपवर टाकलेले मेसेज कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हॉट्स अॅप मेसेजवरून सुरू झालेल्या या वादाचे पर्यवसान नंतर हाणामारीत झाल्याची माहिती हाती आली आहे.
शिक्षक बॅँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक राजमोहन पाटील आणि हातकणंगले पंचायत समितीतील पगारपत्रक विभागाचे लिपिक एस. के. येळे यांच्यामध्ये गुरुवारी (दि. १६) दुपारी हाणामारी झाली होती.हाणामारीच्या आधी पाटील हे काही दिवस शिक्षकांच्या पगाराबाबत येळे यांच्याकडे चौकशी करत होते. याबाबत त्यांनी शिक्षकांच्या ग्रुपवर मेसेज टाकला होता. यामध्ये येळे यांच्याबाबत त्यांनी असंसदीय शब्द वापरल्याचे समजते. शिक्षकांच्या गु्रपवर पाटील यांनी असा मेसेज टाकल्याने येळे संतापले. त्यांनीही त्यापेक्षा घाणेरड्या भाषेत त्यांना या ग्रुपवरूनच उत्तर दिले.
त्यामुळे हे दोघे जेव्हा पंचायत समितीच्या आवारात समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात हाणामारी झाली. यानंतर पंचायत समितीच्या मासिक सभेत पदाधिकाऱ्यांनी पाटील यांची बाजू ऐकून घेतली. मात्र, येळे यांना बोलावले असता ते परस्पर रजा टाकून निघून गेल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी कोल्हापूर जिल्हा प्र्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमन मित्तल यांची भेट घेऊन येळे यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्याची सखोल चौकशी करून कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
घटनेचा अहवाल जिल्हा परिषदेत
दरम्यान, या घटनेचा अहवाल तातडीने जिल्हा परिषदेत मागवून घेण्यात आला आहे. गटविकास अधिकाºयांना या घटनेचा अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा अहवाल हातकणंगले पंचायत समितीतून पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आता याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल काय भूमिका घेणार आहेत, याकडे साºयांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये मारहाणीचे समर्थन करता येणार नाही. या घटनेचा अहवाल मी मागविला असून, संबंधित कर्मचाºयाची चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
- अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., कोल्हापूर