शासकीय योजनांचा लाभ देण्याची ‘हस्तकला संघा’ची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:21+5:302020-12-09T04:18:21+5:30
कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांच्या लाभापासून हस्तकला कारागिरांना वंंचित ठेवले आहे, त्या योजनांचा लाभ या ...
कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांच्या लाभापासून हस्तकला कारागिरांना वंंचित ठेवले आहे, त्या योजनांचा लाभ या हस्तकला कारागिरांना मिळावा यासाठी हस्तकला कारागीर कामगार कल्याण संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. संघाचे संस्थापक-अध्यक्ष दीपक यादव राज्य संघटक जयवंत सोनवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली.
असंघटित असलेल्या हस्तकला कारागीर कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा अशी आग्रही मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष दीपक यादव, राज्य संघटक जयवंत सोनवले, पश्चिम महाराष्ट्र संघटक संजय सुतार, पश्चिम महाराष्ट्र सचिव प्राध्यापक सतीश उपळावीकर, सांगली जिल्हाध्यक्ष प्राचार्य लक्ष्मण लोहार, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अशोक माने, शहराध्यक्ष महेश सूर्यवंशी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा बेलवलकर, गोविंद कुंभार, आकोबा सुतार, महिपती सपाटे, गणेश कांबळे, सुनील लोकरे, वीर कुंभार, अशोक बामणे, आदींचा सहभाग होता.
फोटो नं. ०८१२२०२०-कोल-हस्तकला संघ
ओळ : शासकीय योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी हस्तकला कारागीर कामगार कल्याण संघातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.
(तानाजी)