हातकणंगले मैदानात चेहरे तेच, ब्रॅँड बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:02 AM2018-12-31T00:02:51+5:302018-12-31T00:02:56+5:30

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदार संघात खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात ...

Handset changed the face, the brand changed | हातकणंगले मैदानात चेहरे तेच, ब्रॅँड बदलले

हातकणंगले मैदानात चेहरे तेच, ब्रॅँड बदलले

Next

अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदार संघात खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात मंत्री सदाभाऊ खोत यांनी शड्डू ठोकला आहे. भाजप-शिवसेना युती झाली तर, हा मतदार संघ शिवसेनेला मिळणार, या भूमिकेतून माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवधनुष्य उचलून आघाडी काँग्रेसवर कडी केली आहे. यामुळे होणाऱ्या लढती पारंपरिक असल्या तरी नेते तेच, पक्षाचा ब्रँड मात्र बदलला आहे.
गत लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मोदी लाटेची हवा पाहूनच भाजपच्या महाआघाडीला पाठिंबा दिला. यावेळी स्वत: हातकणंगले आणि सदाभाऊ खोत यांना माढा लोकसभा मतदार संघ दिला. या तहात शेट्टी जिंकले अन् खोत हरले. खोत यांनी राष्ट्रवादीचे मातब्बर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी काट्याची लढत दिली. याचेच बक्षीस म्हणून खासदार राजू शेट्टी यांच्याच शिफारशीने खोत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तेच दोघे आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या पहिल्याच लोकसभेला हातकणंगले मतदार संघामधून निवेदिता माने यांचा पराभव केला होता. याचा वचपा काढण्यासाठी गत लोकसभा निवडणुकीत निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली. परंतु राष्ट्रवादीने धोका ओळखून ही उमेदवारी काँग्रेस म्हणजेच कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या गळ्यात टाकली. परंतु नरेंद्र मोदी यांच्या लाटेपुढे आघाडी काँग्रेसचा निभाव लागला नाही व त्यांचे पानिपत झाले. आता हीच अवस्था २०१९ च्या निवडणुकीत भाजपची होणार आहे. त्यांच्याकडे सदाभाऊ खोत यांच्याशिवाय दुसरा तगडा उमेदवार नाही, असे रयत क्रांती संघटनेच्या नेत्यांना वाटते. म्हणूनच मंत्री खोत शेट्टी यांना आव्हान देत आहेत.
दुसरीकडे मात्र आघाडी काँग्रेसला खासदार राजू शेट्टी यांच्यासारखा खमक्या उमेदवार मिळाला आहे. त्यामुळे माजी खासदार निवेदिता माने यांचा गट अस्वस्थ झाला आहे. याच रागातून निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश करून खासदार शेट्टी यांना आव्हान देण्याची खेळी केली आहे. परंतु आगामी लोकसभेला भाजप-शिवसेना युती झाली नाही, तर शेट्टी यांच्याविरोधात धैर्यशील माने, सदाभाऊ खोत यांनाच लढावे लागेल. या लढती पारंपरिकच आहेत, परंतु त्यांच्या पक्षांचे ब्रँड मात्र वेगवेगळे आहेत.
‘रयत’च्या पाठीवर : भाजपची झूल
खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असले तरी, त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा ब्रँड पसंत केला आहे; तर त्यांचे शिष्य सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या पाठीवर भाजपची झूल पांघरली आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील भाजप, शिवसेनेच्या आमदारांची ताकद पाहून माजी खासदार निवेदिता माने यांनी थेट शिवसेनेचे धनुष्य पेलून पराजयाचा वचपा काढण्याचा डाव आखला आहे.

Web Title: Handset changed the face, the brand changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.