तळसंदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांत आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:01+5:302021-03-18T04:24:01+5:30

नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह निधीची रक्कम फरकासह अदा केल्याची माहिती ...

Happiness among Talsande Gram Panchayat employees | तळसंदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांत आनंद

तळसंदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांत आनंद

googlenewsNext

नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह निधीची रक्कम फरकासह अदा केल्याची माहिती सरपंच अमरसिंह पाटील यांनी दिली. ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांचा अनेक वर्ष रेंगाळलेला प्रश्न निकाली काढल्याने कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सन २००७पासून राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह निधी पगारातून कपात करूनही त्यांच्या खात्यावर वर्ग केला जात नव्हता. ही फरकाची सर्व रक्कम तळसंदे ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या खात्यावर ग्रामनिधीतून त्वरित वर्ग करून कर्मचाऱ्यांना नवसंजीवनी दिली आहे.

कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा उतरविण्यात आला असून, यासाठी ५० टक्के रक्कम ग्रामपंचायत व ५० टक्के रक्कम प्रत्येक महिन्याच्या कर्मचारी पगारातून कपात करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे किमान वेतनाप्रमाणे पगार देणे सुरु असल्याचे सरपंच अमरसिंह पाटील व लिपीक महादेव चव्हाण व कर्मचाऱ्यांनी सांगितले.

फोटो ओळी : तळसंदे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता दिल्याबद्दल सरपंच अमरसिंह पाटील यांचा कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.

Web Title: Happiness among Talsande Gram Panchayat employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.