तळसंदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांत आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:54+5:302021-03-22T04:21:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : तळसदे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह फरकासह अदा केल्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव : तळसदे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह फरकासह अदा केल्याची माहिती सरपंच अमरसिंह पाटील यांनी दिली. ग्रामपंचायत कर्मचारी यांचा अनेक वर्षांचा रेंगाळलेला प्रश्न निकाली काढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सन २००७ पासून राज्य शासनाच्या आदेशाने राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह निधी पगारातून कपात करूनदेखील त्यांचे खात्यावर वर्ग केली जात नव्हती. फरकाची सर्व रक्कम खात्यावर ग्राम निधीतून त्वरित वर्ग करून कर्मचाऱ्यांना एक नवसंजीवनी दिली आहे.
त्यांचा मेडिकल विमा उतरून ५० टक्के रक्कम ग्रामपंचायत व ५० टक्के रक्कम प्रत्येक महिन्याच्या कर्मचारी पगारातून कपात करून विमा उतरण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशाने किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याचे काम सुरू असल्याचे सरपंच अमरसिंह पाटील व लिपिक महादेव चव्हाण व कर्मचारी यांनी सागितले.
फोटो ओळी : तळसंदे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता दिल्याबद्दल सरपंच अमरसिंह पाटील यांचा कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.