सर्वांसाठी आनंददायी : त्याने केली मात- चार वर्षाच्या मुलाचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 01:54 PM2020-05-05T13:54:00+5:302020-05-05T13:54:57+5:30
उपचार झाल्यानंतर त्याचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह आला होता परंतु त्यानंतर 24 तासातील त्याचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हा मुलगा आता कोरोनामुक्त झाला आहे. तसेच त्याच्या सेवेसाठी रुग्णालयात त्याची आई होती. त्या आईचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे.
इचलकरंजी : येथील कोले मळ्यातील कोरोना बाधीत असलेल्या त्या चार वर्षाच्या मुलाचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तो आता कोरोना मुक्त झाला आहे.
त्याच्यावर येथील आयजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले.
17 एप्रिल ला कोले मळ्यातील एका 70 वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाली होती.20 एप्रिल ला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या सर्व नातेवाईकांची तपासणी केली. त्यात त्याच्या चार वर्षाच्या नातवाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे वस्त्रनगरी हादरली होती. दरम्यान, सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्या वृध्दाचा 30 एप्रिल रोजी मृत्यू झाला. तर या चार वर्षीय नातूवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते.