‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By Admin | Published: March 30, 2017 11:27 PM2017-03-30T23:27:54+5:302017-03-30T23:27:54+5:30

दहावा वर्धापन दिन; सामाजिक बांधीलकी जपणारे दैनिक : माधुरी गायकवाड

Happy anniversary of 'Lokmat' | ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

googlenewsNext



कणकवली : ‘लोकमत’ हे सामाजिक बांधीलकी जपणारे दैनिक आहे. ‘लोकमत’ने अनेक उपक्रम राबवून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अल्पावधीतच हे वर्तमानपत्र सिंधुदुर्गात रूजले. गेल्या दहा वर्षांत वाटचाल यशस्वी असून लोकांशी जुळलेली नाळ कायम राहील, असे मत कणकवलीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’ सिंधुदुर्ग आवृत्तीच्या दहाव्या वर्धापनदिनाचे उद्घाटन नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्या हस्ते कणकवली जिल्हा कार्यालयानजीक झाले. यावेळी व्यासपीठावर महामार्ग पोलिस विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक संजय डौर, पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. डॉ. सुभाष आरोसकर, प्रा. सतीश कामत, नीलम सावंत पालव, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, प्रा. राजेंद्र मुंबरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष अबिद नाईक, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, जाहिरात व्यवस्थापक राम जोशी, उपसरव्यवस्थापक (निर्मिती) बाजीराव ढवळे, उपव्यवस्थापक मनुष्यबळ व प्रशासन संतोष साखरे, उपव्यवस्थापक इलेक्ट्रॉनिक्स भैय्यासाहेब देशमुख, सहाय्यक व्यवस्थापक आयसीडी महावीर विभुते, आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक आदी उपस्थित होते.
सभापती भाग्यलक्ष्मी साटम म्हणाल्या, ‘लोकमतने विविध पुरवण्यांद्वारे लाकांच्या मनात रूजले आहे. ‘लोकमत’मध्ये वाचनीय बातम्या असतात. महिलांवरील अत्याचार, अन्याय याच्या बातम्या लोकमतच्या मोठ्या प्रमाणात प्रसिध्द व्हाव्यात, असे लिखाण लोकमतने प्रसिध्द कराव्यात अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डौर म्हणाले, सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक आदी सर्व क्षेत्राला ‘लोकमत’ने स्पर्श केला आहे. माणसाच्या मनातील गोष्टी ‘लोकमतने टिपल्या आहेत. बातम्या वाचून आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे. आमचे जर काही चुकले असेल तर आम्हाला नेहमीच वाट दाखविली आहे. लोकांच्या नेहमीच समस्या मांडल्यामुळे लोकमत घराघरापर्यंत पोहोचवला आहे.
वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख म्हणाले, आम्ही लोकांना नवनवीन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज दररोज २२ लाख वाचकांच्या घरी दररोज लोकमत जातो. विचारामुळे लोक प्रेरित होत आहेत. मुलांनी काही तरी चांगले वाचावे या साठी ५ हजार शाळांमध्ये संस्कार मोतीच्या माध्यमातून मुले संस्कारीत करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल बक्षीस देण्यात आले आहे. लोकांशी जोडलेली नाळ आगामी काळात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.
माजी नगराध्यक्ष मेघा गांगण म्हणाल्या, लोकमतने नवीन पिढीपर्यंत जाण्यासाठी बालविकास मंचची वैचारिक मांडणी केली आहे. वैचारिक पातळी उंचावण्यासाठी लोकमतचे प्रयत्न कौतुकास्पद आहे.
अ‍ॅड. डॉ. सुभाष आरोसकर म्हणाले, आजचा हा दिवस अविस्मरणीय दिवस आहे. कारण सद्गुरूंचे कार्य करीत असताना लोकमतने संपूर्ण पान वामनराव पै यांच्या विचारांना दिले आहे. एवढी लोकमतची सद्गुरूंच्या कार्याशी नाळ जोडली आहे.
अबिद नाईक म्हणाले, पत्रकार हा सर्वांमधील दुवा आहे. पत्रकार हा ज्ञान देत असतो. घरात बसून देशातील सर्व माहिती लोनांना मिळते. प्रा. सतीश कामत म्हणाले, फेरफटकामुळे लोकांशी नाते दृड झाले आहे. बालविकास मंच हे बालमनावर संस्कार करण्याचे काम करीत आहे. लोकमतने सामाजिक बांधिलकी जपून आज सर्वांपर्यत पोहोचला आहे.
नीलम पालव म्हणाल्या, लोकमतच्या आॅक्सिजन पुरवणीने तर आम्ही वाडङ्मयीन आॅक्सिजन घेत आहोत. सखी पुरवणीमुणे तर लोकमत सर्व महिलांपर्यंत पोहोचला आहे. आता लोकमतने पाककला स्पर्धा घ्याव्यात. या साठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे त्या म्हणाल्या.
प्रा. अनिल फराकटे यांनी लोकमत विचारांचे सदृढीकरण करीत आहे, असे सांगितले. प्रा. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, लोकमत हे निर्भिड दैनिक आहे. सर्व राज्यातील बातम्या लोकमतमध्ये वाचायला मिळतात. तसेच ते एक वाचनीय दैनिक आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Happy anniversary of 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.