गंगावेश येथे‘खड्ड्यांचा वाढदिवस’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 03:59 PM2019-12-13T15:59:52+5:302019-12-13T16:01:11+5:30

सहसा जन्माचा, लग्नाचा वाढदिवस केला जातो. कोल्हापुरात शुक्रवारी चक्क खड्ड्यांचा वाढदिवस करण्यात आला. गंगावेश चौकातील खड्डयांभोवती आकर्षक अशी रांगोळी काढून केक कापून हा वाढदिवस करण्यात आला. कोल्हापुरातील जिल्हा वाहनधारक महासंघाने महापालिकेच्या विरोधात हे अभिनव आंदोलन केले. ‘हॅप्पी बर्थडे टू खड्डे’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

Happy Birthday in Gangavesh | गंगावेश येथे‘खड्ड्यांचा वाढदिवस’ 

शहरातील खराब रस्त्यांविरोधत जिल्हा वाहनधारक महासंघाने आंदोलन सुरु केले आहे. शुक्रवारी गंगावेश येथे खड्ड्यांमध्ये केक कापून वाढदिवस करण्यात आला. यावेळी चंद्रकांत भोसले, अभिजित देवणे, राजेंद्र जाधव, उदय गायकवाड आदी. उपस्थित होते. छाया : आदित्य वेल्हाळ

googlenewsNext
ठळक मुद्देगंगावेश येथे‘खड्ड्यांचा वाढदिवस’ जिल्हा वाहनधारक महासंघाचे अभिनव आंदोलन

कोल्हापूर : सहसा जन्माचा, लग्नाचा वाढदिवस केला जातो. कोल्हापुरात शुक्रवारी चक्क खड्ड्यांचा वाढदिवस करण्यात आला. गंगावेश चौकातील खड्डयांभोवती आकर्षक अशी रांगोळी काढून केक कापून हा वाढदिवस करण्यात आला. कोल्हापुरातील जिल्हा वाहनधारक महासंघाने महापालिकेच्या विरोधात हे अभिनव आंदोलन केले. ‘हॅप्पी बर्थडे टू खड्डे’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

महापूर आणि परतीच्या पावसाने शहराला झोडपल्यामुळे अगोदरच खराब असणारे रस्ते आणखीन खराब झाले आहेत. महापालिकेने खराब रस्ते नव्याने करण्याची मागणी जिल्हा वाहनधारक महासंघाने केली आहे. प्रशासनासोबत त्यांची बैठकही झाली. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी १५ दिवसांत रस्ते करण्याची ग्वाही दिली. अद्यापही शहरातील सर्वच रस्ते पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे महासंघाने पुन्हा जोमाने आंदोलन सुरु केले आहे.

गुरुवारी गंगावेश येथील खड्ड्यांचा वाढदिवस केला. खड्ड्या भोवती रांगोळी घालून केक कापन्यात आला. यावेळी चंद्रकांत भोसले, अभिषेक देवणे, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, अशोक जाधव, प्रकाश पोवार, किशोर कांबळे, दिलीप सूर्यवंशी, दिनमहंमद शेख, उदय गायकवाड, संजय काकडे, अतुल माळकर, भास्कर भोसले, सचिन निकम, नजीर मणेर उपस्थित होते.
 

 

Web Title: Happy Birthday in Gangavesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.