वाढदिनी उद्या शरद पवार यांना ऑनलाईन शुभेच्छा,पहिला मान कोल्हापूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:03 PM2020-12-11T16:03:16+5:302020-12-11T16:07:35+5:30

CoronaVirusUnlock, sharadPawar, Kolhapurnews, Ncp कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी होत असलेल्या शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विशेष खबरदारी म्हणून एकच कार्यक्रम होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण राज्यभरात ११ ते २ या एकाच वेळी होणार आहे. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील कार्यकर्ते थेट पवार यांच्याशी बोलणार आहेत. सर्वांत आधी मान कोल्हापूर जिल्ह्याचा असणार आहे.

Happy birthday to Sharad Pawar online tomorrow, first to Kolhapur | वाढदिनी उद्या शरद पवार यांना ऑनलाईन शुभेच्छा,पहिला मान कोल्हापूरला

वाढदिनी उद्या शरद पवार यांना ऑनलाईन शुभेच्छा,पहिला मान कोल्हापूरला

googlenewsNext
ठळक मुद्दे वाढदिनी उद्या शरद पवार यांना ऑनलाईन शुभेच्छाशाहू सांस्कृतिक सभागृहात आयोजन : ऑनलाईन संवादाचा पहिला मान कोल्हापूरला

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी होत असलेल्या शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विशेष खबरदारी म्हणून एकच कार्यक्रम होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण राज्यभरात ११ ते २ या एकाच वेळी होणार आहे.

कोल्हापुरात मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक सभागृहात हजारावर नेते, कार्यकर्ते ऑनलाईन पद्धतीने पवार यांना शुभेच्छा देऊन ५५ वर्षांच्या राजकीय, सामाजिक प्रवासाच्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होणार आहेत.

मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा सोहळा होणार आहे. यावेळी पवार यांच्या राजकीय, सामाजिक प्रवासाची चित्रफीत दाखवली जाणार आहे. कोल्हापुरात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपण सोहळा होणार आहे. शाहू सभागृहात एक हजारजणांच्या बसण्याची सोय केली आहे, तर मोठे स्क्रीन लावले जाणार आहेत. या सोहळ्यात शरद पवार स्वत: निवडक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संवाद साधणार आहेत.

कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील कार्यकर्ते थेट पवार यांच्याशी बोलणार आहेत. सर्वांत आधी मान कोल्हापूर जिल्ह्याचा असणार आहे. या सोहळ्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, शहर सरचिटणीस सुनील देसाई यांनी दिली.

Web Title: Happy birthday to Sharad Pawar online tomorrow, first to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.