कोल्हापूरात हापूस आले रे....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:50+5:302021-02-11T04:24:50+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत फळांचा राजा ‘हापूस’ची आवक झाली आहे. आज (गुरूवारी) इब्राहिमभाई ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत फळांचा राजा ‘हापूस’ची आवक झाली आहे. आज (गुरूवारी) इब्राहिमभाई बागवान व इकबाल बागवान यांच्या दुकानात सौदा काढण्यात येणार आहे.
यंदा परतीचा लांबलेला पाऊस, त्यानंतर अवकाळीने झोडपल्याने आंब्याचा हंगाम लांबणीवर पडतो की काय? असे वाटत होते. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हापूस आंब्याची आवक कोल्हापुरात सुरू झाली आहे. आवक कमी असली तरी वेळेत हंगाम सुरू झाला आहे. कोल्हापूर बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बुधवारी इब्राहिमभाई बागवान यांच्या अडत दुकानात भाई आयरेकर (देवगड) यांचे १५ हापूस बॉक्स तर इकबाल बागवान यांच्या दुकानात सचिन गोवेकर (कुंभारमठ, मालवण) यांची एक हापूस पेटी व वासुदेव चव्हाण (देवगड) यांच्या एक हापूस पेटीची आवक झाली. त्याचा सौदा आज (गुरूवारी) सकाळी दहा वाजता संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ व बाजार समिती अशासकीय मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अडते, खरेदीदार, शेतकरी व बाजार समितीशी संबधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी केले आहे.