कोल्हापूरात हापूस आले रे....!  एका आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:39 AM2021-02-11T11:39:25+5:302021-02-11T12:06:28+5:30

Mango Hapus Kolhapur Market News- कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत फळांचा राजा हापूसची आवक झाली आहे. आज (गुरूवारी) इब्राहिमभाई बागवान व इकबाल बागवान यांच्या दुकानात सौदा काढलेल्या सौद्यात एका हापूस आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर, तर चार डझनच्या पेटीला ३० हजार भाव मिळाला.

Hapus came to Kolhapur ....! At the rate of Rs. 625 per mango | कोल्हापूरात हापूस आले रे....!  एका आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर

कोल्हापूरात हापूस आले रे....!  एका आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूरात हापूस आले रे....!  एका आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर चार डझनच्या पेटीला ३० हजार भाव

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत फळांचा राजा हापूसची आवक झाली आहे. आज (गुरूवारी) इब्राहिमभाई बागवान व इकबाल बागवान यांच्या दुकानात काढलेल्या सौद्यात एका हापूस आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर, तर चार डझनच्या पेटीला ३० हजार भाव मिळाला.

यंदा परतीचा लांबलेला पाऊस, त्यानंतर अवकाळीने झोडपल्याने आंब्याचा हंगाम लांबणीवर पडतो की काय? असे वाटत होते. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हापूस आंब्याची आवक कोल्हापुरात सुरू झाली आहे. आवक कमी असली तरी वेळेत हंगाम सुरू झाला आहे.

कोल्हापूर बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये बुधवारी इब्राहिमभाई बागवान यांच्या अडत दुकानात भाई आयरेकर (देवगड) यांचे १५ हापूस बॉक्स तर इकबाल बागवान यांच्या दुकानात सचिन गोवेकर (कुंभारमठ, मालवण) यांची एक हापूस पेटी व वासुदेव चव्हाण (देवगड) यांच्या एक हापूस पेटीची आवक झाली. सौद्यात एका हापूस आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर, चार डझनच्या पेटीला २५ हजार, तर ६ डझनच्या पेटीला ३० हजार भाव मिळाला.

बाजार समितीत इब्राहिम आबाभाई बागवान या व्यापाऱ्याच्या ६ नं गाळा येथे झालेल्या सौद्यात देवगडचा शेतकरी योगेश लक्ष्मण आचरेकर यांच्या हापूस आंब्याला मोठा भाव मिळाला. जयवंत कृष्णात वळंजु यांनी एक डझन हापूस ७००० रुपये,तर  हाशिम गूलाबसाब बागवान यांनी १५ नग हापूस आंबा ५००० रुपये दराने विकत घेतला. 

संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ व बाजार समिती अशासकीय मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते आंब्या सौदा आज (गुरूवारी) सकाळी दहा वाजता झाला. यावेळी बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील, अडते, खरेदीदार, शेतकरी व बाजार समितीशी संबधित उपस्थित होते.

Web Title: Hapus came to Kolhapur ....! At the rate of Rs. 625 per mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.