बाललैंगिक अत्याचारप्रकरणी सावर्डेच्या युवकास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:08 PM2020-08-19T16:08:21+5:302020-08-19T16:09:07+5:30
शाळकरी मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपीस बाललैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अमर आण्णाप्पा वडर (वय २४, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. द्वितीय वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली.
कोल्हापूर : शाळकरी मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपीस बाललैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अमर आण्णाप्पा वडर (वय २४, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. द्वितीय वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, पीडित मुलगी दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी शाळेतून घरी जाताना अमर वडर याने तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तिने विरोध केला असताना तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी पेठवडगाव पोलीस ठाण्यात बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदार तपासले. त्या साक्षी तसेच सरकारी वकील ॲड. पी. जे. जाधव यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पेठवडगाव पोलीस ठाण्याचे हे कॉ. एस. बी. मेतके यांनी केला.