हरियाणा, नांदेड, शिमला, पतियाळा, लुधियाना संघांची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:41 PM2019-11-25T12:41:59+5:302019-11-25T12:44:04+5:30
प्रत्युत्तरादाखल खेळताना नागपूर विद्यापीठाने १८.५ षटकांत सर्वबाद ९६ धावांपर्यंत मजल मारली. रितेश पूरकामने ३२ धावा, नीलेश रोटकेने २७ धावा केल्या. गोलंदाजी करताना सिमला संघाकडून सुरेंद्रर सिंगने ४, मुकेश कुमारने २ गडी बाद केले. सामन्यात एच. पी. युनि. सिमला संघाने ७३ धावांनी विजय मिळविला.
कोल्हापूर : अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात लाला लजपतराय विद्यापीठ हरियाणा, नांदेड विद्यापीठ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, एच.पी.यू. सिमला संघ, पंजाब विद्यापीठ पतियाळा, पंजाब विद्यापीठ, लुधियाना या संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत आगेकूच केली. शिवाजी विद्यापीठ व राजाराम कॉलेजच्या मैदानांवर हे सामने झाले.
पहिला सामना हरियाणा येथील लाला लजपतराय विद्यापीठ विरुद्ध सेंट्रल युनिव्हर्सिटी, जम्मू यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना लाला लजपतराय विद्यापीठ संघाने तीन गडी गमवून २८८ धावा केल्या. यामध्ये अनिल कुमारने १४६, विकास ठाकूरने ७२ धावा केल्या. गोलंदाजी करताना सेंट्रल युनिव्हर्सिटी संघाच्या इकबाल भटने दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सेंट्रल संघाने सर्वबाद फक्त ४७ धावा केल्या. गोलंदाजी करताना हरियाणा संघाकडून सतबीर शर्मा याने पाच गडी बाद केले. ‘सामनावीर’चा बहुमान हरियाणाचा अनिल कुमार याला देण्यात आला. हरियाणा संघाने सामन्यात २३४ धावांनी विजय मिळविला.
दुसरा सामना नांदेड विद्यापीठ विरुद्ध गोरमपूर विद्यापीठ यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना गोरमपूर विद्यापीठ संघाने सर्वबाद ९७ धावा केल्या. गोलंदाजी करताना नांदेड संघाकडून जयराम हंबरडे, गोविंद सोनटक्के, शैलेश कांबळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नांदेड विद्यापीठ संघाने १२.२ षटकांत दोन बाद १०१ धावा केल्या. यामध्ये नरसी मुगाडेने ३९, तर अजमेर बिडला याने नाबाद ३० धावा केल्या. गोलंदाजी करताना गोरमपूर विद्यापीठ संघाकडून जया शंकर सिंग, सुरिंदर यादव, मनीष श्रीवास्तव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. नांदेड संघाने ८ गडी राखून विजय मिळविला.
तिसरा सामना जामिया मिलिया इस्लामिया विरुद्ध के. बी. सी. एन. एम. यू. जळगाव संघात झाला. प्रथम फलंदाजी करताना जळगाव संघाने २० षटकांत ७ गडी गमवून ८४ धावा केल्या. यामध्ये शशीकांत शिरसाटने २८, अरविंद गिरगावने २६ धावा केल्या. जामिया संघाकडून गोलंदाजी करताना महंमद अखलाकने तीन गडी बाद केले; तर सरफराज मसूदने दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना जामिया विद्यापीठ संघाकडून जामिया संघाने ९.२ षटकांत दोन गडी बाद ८५ धावा केल्या. यामध्ये जामिया संघाकडून महंमद वाहीदने २४, साद कारिमीने नाबाद ३० धावा केल्या. गोलंदाजी करताना जळगाव संघाकडून दीपक मोरने १ गडी बाद केला. सामन्यात जामिया इस्लामिया संघाने ८ गडी राखून विजय मिळविला.
एच.पी. युनि. सिमला संघ विरुद्ध आर.टी. एम. नागपूर यांच्यामध्ये सामना झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एच. पी. युनि. सिमला संघाकडून २० षटकांत ८ बाद १६९ धावा केल्या. यामध्ये राजेश चौहानने ७८ धावा, मुकेशकुमारने ३७ धावा केल्या. गोलंदाजी करताना आर. टी. एन., नागपूर संघाकडून महेंद्र बनकरने ३, दीपक घोडमारेने २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नागपूर विद्यापीठाने १८.५ षटकांत सर्वबाद ९६ धावांपर्यंत मजल मारली. रितेश पूरकामने ३२ धावा, नीलेश रोटकेने २७ धावा केल्या. गोलंदाजी करताना सिमला संघाकडून सुरेंद्रर सिंगने ४, मुकेश कुमारने २ गडी बाद केले. सामन्यात एच. पी. युनि. सिमला संघाने ७३ धावांनी विजय मिळविला.
पंजाब विद्यापीठ, पतियाळा विरुद्ध डॉ. पी. डी. के. व्ही. अकोला संघ यांच्यामध्ये सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना अकोला संघाने सर्वबाद ९३ धावा केल्या. यामध्ये नीरज सातपुते याने २६, जगदीश परमारने १९ धावा केल्या. गोलंदाजी करताना पंजाब विद्यापीठ संघाकडून गुरुप्रीत सिंहने ३, प्रीतपालने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाब विद्यापीठ संघाकडून १२ षटकांत दोन गडी गमवून ९४ धावा केल्या. पंजाब पतियाळा संघाकडून गुरुप्रीत सिंहने नाबाद ३१, प्री्रतपाल सिंहने २८, पंकज प्रशारने १५ धावा केल्या. अशा प्रकारे पंजाब पतियाळा संघाने ८ गडी राखून विजय मिळविला.
पंजाब विद्यापीठ, लुधियाना विरुद्ध शेर-ए-काश्मीर विद्यापीठ, जम्मू यांच्यामध्ये सामना झाला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शेर-ए-काश्मीर संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १०१ धावा केल्या. यामध्ये नीरज मनहासने ४१ धावा केल्या. विनोद कुमारने २४ धावा केल्या. गोलंदाजी करताना पंजाब विद्यापीठ संघाकडून सिंगने ५ गडी बाद केले. विनोद कुमारने २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाब विद्यापीठ, लुधियाना संघाकडून १२.५ षटकांत चार गडी गमवून १०२ धावा केल्या. पंजाब विद्यापीठ संघाकडून समरजित सिंगने ६५ केला. अशा प्रकारे लुधियाना पंजाब विद्यापीठ संघाकडून ६ गडी राखून विजय मिळविला.