पदवीधर महामंडळाची भाषा करणाऱ्यांनी बारा वर्षे गोट्या खेळल्या का?, हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 06:36 PM2020-11-21T18:36:32+5:302020-11-21T18:39:32+5:30
politics, bjp, chandrakantpatil, hasanmusrif, jyantpatil, kolhapur, punepadwidharelecation भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आता पदवीधरांच्या महामंडळाची भाषा करत आहेत. मग गेली १२ वर्षे ते गोट्या खेळत होते का? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. चंद्रकांत पाटील हे पदवीधरवर निवडून गेल्यापासून तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, पदवीधरांचे प्रश्न वाढल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात झालेल्या सभेत ते बोलत होते.
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आता पदवीधरांच्या महामंडळाची भाषा करत आहेत. मग गेली १२ वर्षे ते गोट्या खेळत होते का? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. चंद्रकांत पाटील हे पदवीधरवर निवडून गेल्यापासून तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, पदवीधरांचे प्रश्न वाढल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात झालेल्या सभेत ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील हे बारा वर्षे पदवीधरांचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यात मागील पाच वर्षे तर ते सत्तासम्राट होते, दोन नंबरचे मंत्री होते. त्यावेळी ते पदवीधरांचे प्रश्न सोडवायचे सोडा, त्यांना भेटही देत नव्हते.
मंत्री जयंत पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील जिथे जातात तिथे पक्षातील लोकांना आपला परिणाम दाखवतात. पुण्यातील भाजपचे पदाधिकारी फोन करून सांगतात, आचारसंहिता असल्याने ते काय म्हटले हे सांगणार नाही. मात्र जिथे जिथे चंद्रकांत पाटील जातात, तिथे ते विरोधकांचा फायदा कसा होईल, हेच ते पाहतात.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर यांच्यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे आमदार, माजी आमदार उपस्थित होते.