Hasan Mushrif ED Raid : पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते मुश्रीफांच्या निवासस्थानकडे, भाजप विरोधात घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 11:37 AM2023-01-11T11:37:56+5:302023-01-11T11:38:53+5:30

हसन मुश्रीफ यांना त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार

Hasan Mushrif ED Raid: Defying police opposition, activists march to Mushrif residence, raise slogans against BJP | Hasan Mushrif ED Raid : पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते मुश्रीफांच्या निवासस्थानकडे, भाजप विरोधात घोषणाबाजी

Hasan Mushrif ED Raid : पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते मुश्रीफांच्या निवासस्थानकडे, भाजप विरोधात घोषणाबाजी

googlenewsNext

जहाँगीर शेख

कागल : आमदार हसन मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानावर ईडीचा छापा पडल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरू केली आहे. या दोन्ही ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कागल शहरातील प्रमुख मार्गावर दुकाने बंद ठेवली आहेत.

पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते  मुश्रीफांच्या निवासस्थानासमोर गेले. यासर्व प्रकारामुळे कागलमधील वातावरण तणावपुर्ण  बनले आहे. अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी भय्या माने, युवराज पाटील यांना सांगून कार्यकर्त्याना गैबी चौकात आणले.

आमदार हसन मुश्रीफ हे मुबंईत असून प्रकाश गाडेकरही परगावी आहेत. या कारवाईची कागल पोलिसांना ही कल्पना नव्हती. त्यांनाही कारवाई ठिकाणापासुन दूर ठेवण्यात आले आहे. जवळपास तीस ते पस्तीस जणांचे पथक असून केंद्रीय पोलिसांचा बंदोबस्त या पथकाबरोबर आहे. निवासस्थाच्या चारी बाजुला हा बंदोबस्त आहे. मुश्रीफांच्या निवासस्थानी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, जेष्ठ चिरंजीव साजीद मुश्रीफ हजर आहेत.

गडहिंग्लज शहर बंदचा निर्णय 

हसन मुश्रीफ यांना त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार आहे, याचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज बंद करण्याचा आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. घरामध्ये एके 47 रायफली तैनात केलेले पोलिस लावून अशा पद्धतीची दहशत माजवून एका चांगले काम करणाऱ्या नेत्याला असा मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने घातलेले हे ईडीचे छापे आहे,  त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांना उद्योजकांना सर्वांनी आजच्या दिवशी गडहिंग्लज कडकडीत बंद पाळण्यात यावा, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. दुसरीकडे मुरगूडमधील व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Hasan Mushrif ED Raid: Defying police opposition, activists march to Mushrif residence, raise slogans against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.