कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्या; हसन मुश्रीफांचे सोमय्यांना आवाहन

By विश्वास पाटील | Published: February 22, 2023 06:22 PM2023-02-22T18:22:32+5:302023-02-22T18:22:50+5:30

 कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्यावी असे आवाहने हसन मुश्रीम यांनी किरीट सोमय्यांना केले आहे. 

 Hasan Mushrif has appealed to Kirit Somaiya to come to Kolhapur District Bank and get the required information  | कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्या; हसन मुश्रीफांचे सोमय्यांना आवाहन

कोल्हापूर जिल्हा बँकेत या आणि हवी ती माहिती घ्या; हसन मुश्रीफांचे सोमय्यांना आवाहन

googlenewsNext

कोल्हापूर: माजी खासदार किरीट सोमय्या गुरुवारी दि. २३  कोल्हापूरमध्ये येत आहेत. कोल्हापुरात आल्यानंतर ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयाला भेट देणार असल्याचे वृत्तपत्रांमधील बातम्यांमधून समजले. केडीसीसी बँकेमध्ये त्यांचे स्वागतच आहे, असे बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी जाहीर केले..
              
सोमय्या यांच्या केडीसीसी बँकेच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार श्री. मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.       

आमदार मुश्रीफ म्हणाले, यापूर्वीच मी सोमय्या यांना आवाहन केले आहे की, तुम्ही बँकेत या आणि तुम्हाला जी-जी  माहिती हवी असेल ती घ्या. प्रशासकाची कारकीर्द संपल्यानंतर बँकेने गेल्या आठ वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे. विविध पक्षांचे प्रतिनिधी असलेले संचालक मंडळ एकमताने काम करीत आहोत. त्यामुळेच बँकेची यशस्वी वाटचाल होत आहे. या घडीला बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के आहे. गेल्या ३१ डिसेंबर २०२२ अखेर बँकेला १०५  कोटी नफा झालेला आहे.

 

Web Title:  Hasan Mushrif has appealed to Kirit Somaiya to come to Kolhapur District Bank and get the required information 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.