कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, राजेश पाटील हे शरद पवार यांच्या सोबतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 01:26 PM2019-11-23T13:26:03+5:302019-11-23T13:54:32+5:30

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना वजनदार कॅबिनेट खाते मिळणार होते. त्याचबरोबर चंदगड विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील हे पहिल्यांदा निवडून आले आहेत.

Hasan Mushrif, Kolhapur and Rajesh Patil along with Sharad Pawar | कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, राजेश पाटील हे शरद पवार यांच्या सोबतच

कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, राजेश पाटील हे शरद पवार यांच्या सोबतच

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार हसन मुश्रीफ हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारीयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांच्या मागेच हसन मुश्रीफ उभे होते.

कोल्हापूर : राष्टवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील हे दोघेही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतच राहिले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील पक्षाचे सर्वच पदाधिकारी पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

आमदार हसन मुश्रीफ हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना वजनदार कॅबिनेट खाते मिळणार होते. त्याचबरोबर चंदगड विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. ते खासदार संजय मंडलीक यांचे मेहुणे असून मंडलीक व मुश्रीफ यांच्या ताकदीवरच ते आमदार झाले. त्यामुळे दोघेही शरद पवार यांच्यासोबतच राहणार हे निश्चित आहे. शनिवारी दुपारी साडे बारा वाजता झालेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांच्या मागेच हसन मुश्रीफ उभे होते.

Web Title: Hasan Mushrif, Kolhapur and Rajesh Patil along with Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.