हसन मुश्रीफ अजूनही मोठे होतील : शिवलिंगेश्वर महास्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 11:56 AM2020-12-21T11:56:52+5:302020-12-21T11:58:50+5:30

Hasan Mushrif kolhapurnews -राजघराण्यात जन्मूनही राजर्षी शाहू महाराजांनी गोरगरिबांना आपलसं केलं.त्यांच्याच लोकसेवेचे अनुकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत. त्यामुळेच ते अजूनही मोठे होतील,असे गौरवोद्गार निडसोशी मठाचे मठाधिपती श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले.

Hasan Mushrif will still grow up: Shivalingeshwar Mahaswami | हसन मुश्रीफ अजूनही मोठे होतील : शिवलिंगेश्वर महास्वामी

गडहिग्लज येथील बेलबागेत आश्रमात बहिरेवाडी येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे वडील वीरपिता रामचंद्र व आई वीरमाता सौ. कविता यांचा सत्कार झाला.यावेळी श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी, श्री. महाबसव स्वामीजी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,राजू हंजी, सुवर्णा हंजी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देहसन मुश्रीफ अजूनही मोठे होतील : शिवलिंगेश्वर महास्वामी गडहिंग्लज येथील कार्यक्रमात मुश्रीफ यांच्या जनसेवेचे कौतुक

गडहिंग्लज :राजघराण्यात जन्मूनही राजर्षी शाहू महाराजांनी गोरगरिबांना आपलसं केलं.त्यांच्याच लोकसेवेचे अनुकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत. त्यामुळेच ते अजूनही मोठे होतील,असे गौरवोद्गार निडसोशी मठाचे मठाधिपती श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले.

येथील बेलबाग आश्रमात श्री. जडेयसिद्धेश्वर स्वामीजींच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

महास्वामीजी म्हणाले, मुश्रीफ यांचे नेतृत्व गोरगरिबांची सेवा आणि विधायक कामातून उभे राहिले आहे.शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठीही मुश्रीफ फाऊंडेशनने मोलाची मदत केली आहे.
मुश्रीफ म्हणाले, मानवतावादी लिंगायत धर्माची स्थापना म. बसवेश्वर महाराजांनी केली.त्यांच्या विचारांचा प्रसार जडेयसिद्धेश्वर स्वामीजी आणि चंद्रम्मा माताजी यांनी केला.त्यांचे काम पुढे नेण्याची गरज आहे.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, किरण कदम, डॉ सदानंद पाटणे, डॉ नागेश पट्टणशेट्टी, अमर चव्हाण, बाळेश नाईक, हारुण सय्यद, रमजान अत्तार, अभय देसाई, ज्योत्स्ना पताडे, सोमगोंडा आरबोळे, शेखर यरटे, सुनील शिंत्रे, दिलीप माने, उर्मिला जोशी, शुभदा पाटील, शबाना मकानदार, सुनीता नाईक, राजशेखर दड्डी, काडाप्पा हंजी, नागाप्पा कोल्हापुरे, राजेंद्र गड्याणावर, बाळासाहेब घुगरे, उपस्थित होते.

मुश्रीफ मुख्यमंत्री होतील..!

मंत्री मुश्रीफ यांच्यामुळेच मी राजकारणात आलो.विकास कामांबरोबरच गोरगरिबांच्या सेवेचे त्यांचे कार्य प्रचंड आहे.त्यामुळे भविष्यात ते राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी व्यक्त केला.

आश्रमासाठी ५० लाख देणार !

बेलबाग आश्रमातील नियोजित ध्यानमंदीर, वाचनालय आणि आश्रम परिसर सुशोभिकरणासाठी ५० लाखाचा निधी देण्याची घोषणा मुश्रीफ यांनी यावेळी केली.
 

Web Title: Hasan Mushrif will still grow up: Shivalingeshwar Mahaswami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.