Hasan Mushriff: ...तो पर्यंत माझ्या केसाला ही धक्का लागणार नाही, हसन मुश्रिफांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 04:12 PM2022-08-14T16:12:34+5:302022-08-14T16:13:05+5:30
मुरगूड मध्ये बांधकाम साहित्य शिष्यवृत्ती वितरण
कोल्हापूर/ मुरगूड (अनिल पाटील):- सर्वसामान्यांच्यासाठी कायदे, योजना आम्ही बनवण्यासाठी पुढाकार घेतला.त्यामुळे उगाचच नाटकीपणा करणाऱ्याना या योजनांची काय माहिती असणार. सर्वसामान्य जनतेबरोबर सुख दुःखाच तीस वर्षाच नात आहे. या जनतेला पुरं माहिती आहे. त्यामुळे कोणी काही म्हणो गरीब माणसांचे आशीर्वाद माझ्या मागे जोपर्यंत आहेत, तो पर्यंत माझ्या केसालाही धक्का लागणार नाही असा विश्वास माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
मुरगूड ता कागल येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने बांधकाम कामगाराना साहित्य शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील उपस्थित होते.यावेळी कोजीमाशी चे संचालक अविनाश चौगले,राजेंद्र पाटील,अमर देवळे यांचा सत्कार करण्यात आला.स्वागत दिगंबर परीट यांनी केले तर प्रास्ताविक शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष रणजित सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी मुश्रीफ म्हणाले सरकार बदलल्याने आपला विकास निधी थांबणार नाही खुद्द एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी दिला होता.गिव्ह आणि टेक पद्धतीने आपण निधी आणला आहे.आपण विधानसभा निवडणूक लढवणार नाही असं कधीच म्हटलं नसून लोकांची इच्छा आहे की मी खासदार व्हावं अस ही त्यांनी सांगितले.यावेळी माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांनी भाजपने महागाई वाढवली असून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगून आपण एकाकी असलो तरी राष्ट्रवादी च्या बॅनर खाली लढणार असून चढ उतार येत असतातच,आपण कधीच लाचारीच राजकारण करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चंद्रकांत जाधव,डी डी चौगले,सम्राट मसवेकर यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमास जि प सदस्य मनोज फराकटे,माजी उप नगराध्यक्ष शामराव घाटगे,लक्ष्मण चौगले, राजू आमते,रवी परीट, सुनील चौगले,नामदेव भांदिगरे,रणजित मगदुम,नंदकिशोर खराडे,विकी बोरगावे,अमित तोरसे,आदी प्रमुख उपस्थित होते.आभार विक्रम घाटगे यांनी मानले.