राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:01+5:302021-04-22T04:25:01+5:30
काेल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस विविध सेलच्या वतीने बुधवारी ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील ...
काेल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस विविध सेलच्या वतीने बुधवारी ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, महिला आघाडी, अल्पसंख्याकसह विविध सेलच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकानिहाय रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. बुधवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कार्याध्यक्ष अनिल साळोखे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, युवक जिल्हाध्यक्ष राेहित पाटील, शिवानंद माळी, रामराव इंगळे, बाळासाहेब खैरे, कृष्णात पुजारी, बाळासाहेब देशमुख, शिरीष देसाई, कल्पेश चौगुले, संदीप मेंगाणे, यासीन मुजावर, शिवाजी देसाई, आप्पासाहेब धनवडे आदी उपस्थित होते.
शहर राष्ट्रवादीतर्फे शनिवारी रक्तदान शिबिर
राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने शनिवारी (दि. २४) सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी दिली.
फोटो ओळी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या वाढदिवस बुधवारी जिल्हा राष्ट्रवादीतर्फे केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शिवानंद माळी, बाळासाहेब खैरे, बाबासाहेब पाटील, रोहित पाटील आदी उपस्थित होते. (फोटो -२१०४२०२१-कोल-एनसीपी)