मुश्रीफांचे मिशन आता ‘गडहिंग्लज पालिका’! राष्ट्रवादीचा आत्मविश्वास दुणावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 07:45 AM2022-11-15T07:45:11+5:302022-11-15T07:47:41+5:30

कारखान्यातील यशामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांचे शहरावरील वर्चस्व आणि पालिकेची सत्ता टिकवण्याचे आव्हान जनता दलासमोर आहे.

Hasan Mushrif's mission is now 'Gadhinglaj Palika'! The NCP's confidence was shattered | मुश्रीफांचे मिशन आता ‘गडहिंग्लज पालिका’! राष्ट्रवादीचा आत्मविश्वास दुणावला

मुश्रीफांचे मिशन आता ‘गडहिंग्लज पालिका’! राष्ट्रवादीचा आत्मविश्वास दुणावला

googlenewsNext

- राम मगदूम

 गडहिंग्लज : गडहिंग्लज कारखान्याची सत्ता एकहाती काबीज केल्यानंतर आता गडहिंग्लज नगरपालिकेची सत्ता हस्तगत करणे हेच माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे मिशन आहे. कारखान्यातील यशामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांचे शहरावरील वर्चस्व आणि पालिकेची सत्ता टिकवण्याचे आव्हान जनता दलासमोर आहे. हम

गेल्यावेळी कारखान्याच्या निवडणुकीत मुश्रीफ-शिंदे एकत्र आले. परंतु, त्यानंतर ते पालिकेच्या निवडणुकीत एकमेकांविरूद्ध लढले. १८ पैकी ११ जागा जिंकून जनता दलाने निर्विवाद बहुमताने सत्ता राखली. निवडणुकीनंतर भाजपा-शिवसेना युतीने जनता दलाबरोबर आघाडी केली. त्यामुळे कारखान्यात आणि विधानसभेला एकत्र येवूनही ‘राष्ट्रवादी’ला नगरपालिकेत ५ वर्षे विरोधातच बसावे लागले.

दरम्यान, कारखान्यातील संघर्षातून मुश्रीफ-शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाला. म्हणूनच, शिंदेच्या विरोधात कुपेकर, शहापूरकर, चव्हाण, हत्तरकी, कुराडे, पताडे, गुरबे व अप्पी पाटील यांची मोट बांधून मुश्रीफांनी गडहिंग्लज कारखान्याची सत्ता मिळवली. त्याचे पडसाद नगरपालिकेच्या निवडणुकीत उमटणार आहेत.

देशात कुठेही सत्तेवर नसलेल्या जनता दलाने गेली ५० वर्षे गडहिंग्लज शहरावरील पकड कायम ठेवली आहे. शिंदे यांचे तीन पिढ्यांशी असलेले ऋणानुबंध व सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ, आरक्षण नसतानाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलेली नगराध्यक्षपदाची संधी यामुळेच हे शक्य झाले. परंतु, नेहमी सत्तेच्या विरोधात राहिल्यामुळे शहराच्या विकासाकरिता पुरेसा निधी मिळविण्यात मर्यादा पडल्या.

नेमका हाच मुद्दा पुढे करून सुरूवातीला बाबासाहेब कुपेकर आणि त्यानंतर मुश्रीफ व कुपेकरांनी तीनवेळा सत्तांतर घडवले. पण, मिळालेली सत्ता टिकवण्यात राष्ट्रवादीला अपयश आल्यामुळेच पुन्हा जनता दलाला संधी मिळाली. हा पूर्वानुभव लक्षात घेवूनच मुश्रीफांनी जोडण्या लावल्याची झलक कारखान्याच्या निवडणुकीत पहायला मिळाली आहे.

- गेल्यावेळचेबलाबल

जनता दल - १३, राष्ट्रवादी - ६, शिवसेना - १, भाजपा - ०

* गेल्यावेळी सत्ताधारी जनता दल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा-शिवसेना युती अशी तिरंगी लढत झाली. यावेळी जनता दल विरूद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, काँगे्रस, ठाकरेंची शिवसेना, ‘मनसे’चा समावेश राहिल.

* शहापूरकरांनी शहरातील भाजपा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे ते ‘जद’सोबत जाण्याची शक्यता असून शिंदेंची शिवसेनाही त्यांच्याबरोबरच राहिल.

Web Title: Hasan Mushrif's mission is now 'Gadhinglaj Palika'! The NCP's confidence was shattered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.