डिसलेसह त्यांच्या आई-वडिलांचा हसन मुश्रीफ यांच्याकडून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 10:55 AM2020-12-08T10:55:55+5:302020-12-08T10:57:00+5:30
Teacher, Hasan Mushri, Mumbai, kolhapur ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्यासह त्यांच्या आई पार्वती व वडील महादेव यांचा सत्कार सोमवारी मुंबईत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
कोल्हापूर : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्यासह त्यांच्या आई पार्वती व वडील महादेव यांचा सत्कार सोमवारी मुंबईत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनच्या वारकी फौंडेशनने सात कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर केला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, रणजितसिंह डिसले यांच्या कर्तृत्वाचा योग्य सन्मान झाला असून त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षकांनाही करून द्यावा.
उपक्रमशील असलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींनी क्यूआर कोड पुस्तकांच्या माध्यमातून शैक्षणिक विश्वात एक नवी क्रांती घडवून आणली आहे. त्यांच्या या संशोधनाचा व सर्जनशीलतेचा उपयोग संपूर्ण जगातील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना होणार आहे. गुरुजी व त्यांचे आई-वडीलही भारावले.