मुश्रीफ यांनी केले शहीद जवान जोंधळे यांच्या कुटूंबियांचे सात्वंन, फौंडेशनतर्फे तीन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 03:37 PM2020-11-14T15:37:18+5:302020-11-14T15:49:42+5:30
hasanmusfirf, ajara, kolhapurnews पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेल्या ऋषिकेश रामचंद्र जोंधळे ( वय -२०) यांच्या कुटूंबियांचे सांत्वन बहिरेवाडी ता. आजरा येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ना. हसन मुश्रीफ यांच्या फौंडेशनतर्फे कुंटूबियांना तीन लाखाची मदत दिली जाणार आहे.
उत्तूर/कोल्हापूर : पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेल्या ऋषिकेश रामचंद्र जोंधळे ( वय -२०) यांच्या कुटूंबियांचे सांत्वन बहिरेवाडी ता. आजरा येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ना. हसन मुश्रीफ यांच्या फौंडेशनतर्फे कुंटूबियांना तीन लाखाची मदत दिली जाणार आहे.
भारताच्या सीमारेषेवर पाकिस्तान, चीन सीमेवर भारतभूमीचे रक्षण करताना अनेक जवानांना वीरमरण आले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांसंर्दभात ठाम भूमिका घेतली पाहिजे असे प्रतिपादन हसन मुश्रींफ यांनी केले.
ग्रामविकास मंत्री म्हणाले सैन्याच्या, अतिरेक्यांच्या हल्यात नागरिकांबरोबरच सैनिकांचा दुर्देवी मुत्यू होत आहेत. ते रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर निर्णय घेतले पाहिजेत. शहीद जोंधळे कुंटूबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठाम पणे उभे राहणार आहे. बहिरेवाडी ही नरत्नांची भूभी आहे, त्यामुळे जोंधळे यांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, असे प्रतिपादन हसन मुश्रींफ यांनी केले.
यावेळी सरपंच अनिल चव्हाण, वसंतराव धुरे, शिरीष देसाई, काशिनाथ तेली, दिपक देसाई चंद्रकांत गोरूले, सुरेश खोत, गोविंद सावंत, मारुती घोरपडे आदी सह ग्रामस्थांनी जोंधळे यांच्या कुटूंबियांचे सात्वंन केले.
रविवारी अत्यसंस्कार
रविवारी सकाळी भैरवनाथ हायस्कूलच्या पंटागणांवर अत्यसंस्कार करण्यात आहे. ग्रामस्थांनी तयारी सुरू केली आहे.पार्थिव गावातून अत्यसंस्कारसाठी हायस्कूलच्या पंटागणावर नेण्यात येणार आहे.