हसुर दुमाला आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:33+5:302021-06-02T04:19:33+5:30
या निवेदनातील आशय असा आहे. हसुर दुमाला आरोग्य केंद्राचा आसपासच्या वीसहून अधिक गावांना उपयोग होतो. या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी ...
या निवेदनातील आशय असा आहे. हसुर दुमाला आरोग्य केंद्राचा आसपासच्या वीसहून अधिक गावांना उपयोग होतो. या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित पोळ हे रुग्णांना अरेरावीची व उद्धट वागणूक देतात. इथं कशाला आलाय बाहेर खासगीत जावा, अशी दुरुत्तरे देऊन त्यांना खुपिरे, शिरोली दुमाला, कोल्हापूरला जावा असे सांगतात. काही सामाजिक कार्यकर्ते तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांनाही उद्धट उत्तरे देतात. तसेच तेथील लिपिक भाट हेही रुग्णांवर अरेरावी करतात. या गंभीर प्रकाराबद्दल डॉ. पोळ व भाट हे आरोग्यसेवक असून वैद्यकीय अधिकारी असल्याचा थाट दाखवून कर्मचाऱ्यांसह इतरांना उद्धट उतरे देत असून यांना बडतर्फ करावे व त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अन्यथा या आरोग्य केंद्राला कोरोना काळात टाळे ठोकले जाइल, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्यअधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.