हसूरसासगिरीच्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:21+5:302021-06-24T04:18:21+5:30
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, शेखर हा खाजगी इलेक्ट्रीशियन म्हणून काम करत होता. चिंचेवाडी येथे विद्युत बिघाडाची दुरूस्ती करत ...
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, शेखर हा खाजगी इलेक्ट्रीशियन म्हणून काम करत होता. चिंचेवाडी येथे विद्युत बिघाडाची दुरूस्ती करत असताना त्याला विजेचा जोराचा झटका बसला. त्यामुळे त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकारी सुभाष पाटील यांच्या वर्दीवरून पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहिण असा परिवार आहे.
अर्ध्यावरती डाव मोडीला
सहा महिन्यांपूर्वीच शेखरचा विवाह झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, सुखी संसाराची स्वप्ने रंगविणा-या शेखरवर काळाने झडप घातल्याने नवविवाहित दाम्पत्याचा डाव अर्ध्यावरतीच मोडला.
आई-वडिलांना धक्का
शेखर हा आई-वडीलांना एकुलता होता.त्या ने वाणिज्य शाखेची पदवी घेतली होती. त्याबरोबरच इलेक्ट्रिशियनचा कोर्सही केला होता. गावात पिठाची गिरण चालविण्याबरोबरच लाईट फिटींग व दुरूस्तीचे कामही तो करायचा. त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
चौकट :
महिन्याभरात दुसरा धक्का शेखरचे चुलते सातगोंडा यांचे दीड महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. त्यातून सावरत असतानाच एकुलत्या व होतकरू मुलाच्या अकस्मिक जाण्याने देसाई कुटुंबियांवर महिन्याभरातच दुसरा आघात झाला आहे.
फोटो शेखर देसाई : २३०६२०२१-गड-०८