हातकणंगलेत सभापतिपदासाठी चुरस : निवडीसाठी उद्या सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:59 PM2018-12-18T22:59:05+5:302018-12-18T23:00:24+5:30

पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी उद्या, गुरुवारी हातकणंगले तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.पंचायत समिती सभागृहात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप आणि जनसुराज्य युतीचे

Hathkangalet rally for Chair: | हातकणंगलेत सभापतिपदासाठी चुरस : निवडीसाठी उद्या सभा

हातकणंगलेत सभापतिपदासाठी चुरस : निवडीसाठी उद्या सभा

Next
ठळक मुद्देपंचायत समितीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे गोळाबेरीजला वेग

दत्ता बिडकर ।
हातकणंगले : पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी उद्या, गुरुवारी हातकणंगले तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.पंचायत समिती सभागृहात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप आणि जनसुराज्य युतीचे ११ सदस्य, तर माजी आ. आवाडे यांच्या ताराराणी आघाडीचे ५, शेतकरी संघटना २ आणि शिवसेना २ या विरोधी आघाडीचे ९ सदस्य असून, एक अपक्ष आणि एक काँग्रेस अशा
दोन सदस्यांना कमालीचे महत्त्व आले आहे.

हातकणंगले पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकाचा मागास प्रवर्ग (स्त्री) याकरिता आरक्षित आहे. मार्च २०१७ मध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्यामुळे भाजप (६) आणि जनसुराज्य (५) या दोन पक्षांनी युती करून भाजपच्या रेश्मा सनदी यांना सव्वा वर्षासाठी प्रथम संधी देण्यात आली होती.

या निवडीवेळी काँग्रेस पक्षाचा एकमेव सदस्य गैरहजर राहिल्यामुळे भाजपचा सभापती झाला. भाजपच्या रेश्मा सनदी यांना सव्वा वर्षाचा कालावधी असताना त्यांनी १९ महिन्यानंतर राजीनामा दिला. भाजप- जनसुराज्य युतीनुसार यावेळचा सभापती जनसुराज्य पक्षाचा होणार असून, जनसुराज्य पक्षाकडे नागरिकाचा मागास प्रवर्ग (स्त्री) राखीव या मतदारसंघातून निवडून आलेला उमेदवार नसल्यामुळे सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विरोधी माजी आ. प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी आघाडीने आपल्या ५ सदस्यांसह शिवसेना २ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना २ अशी ९ सदस्यांची बेरीज करून हेर्ले पंचायत समितीमधून अपक्ष निवडून आलेल्या सदस्याला आपल्याकडे वळवून १० सदस्यांची बेरीज केली आहे. काँग्रेसचा एकमेव सदस्य राजकुमार भोसले (नरंदे) यांना या सभापती निवडीमध्ये कमालीचे महत्त्व आले आहे.

ओबीसी महिलेसाठी आरक्षण
हातकणंगले पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकाचा मागास प्रवर्ग (स्त्री) राखीवसाठी आरक्षित आहे. तालुक्यातील हेर्ले, कबनूर (पूर्व) आणि हुपरी (उत्तर) असे तीन पंचायत समितीमधून निवडून आलेले सदस्य या सभापतिपदासाठी पात्र ठरतात. यापैकी हेर्लेमधून अपक्ष मेहरनिगा जमादार, तर भाजपचे दोन कबनूर (पूर्व)च्या रेश्मा सनदी आणि भाजपच्या हुपरी (उत्तर)च्या वैजयंती आंबी या राखीव (स्त्री) सदस्य असून, रेश्मा सनदी यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे, तर वैजयंती आंबी यांचा जातीचा दाखला वैध नाही.
 

भोसले यांना उपसभापतिपद
काँग्रेसचे एकमेव सदस्य राजकुमार भोसले यांना भाजप-जनसुराज्यकडून आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गतवेळी भोसले गैरहजर राहिल्यामुळे भाजपचा सभापती झाला होता. यावेळी त्यांना उपसभापतिपद देण्याबाबत चढाओढ सुरू आहे. भोसले हे महाडिक गटाचे कट्टर समर्थक आहेत. मात्र, माजी मंत्री जयवंत आवळे यांनी त्यांना काँग्रेसची उमेदवारी दिली होती. आवळे-आवाडे यांचे राजकीय मनोमिलन झाले आहे. यामुळे भोसले आवळेंचा आदेश पाळतात की महाडिकांचा हे २० डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.

मोहिते यांच्याकडून जोडणी
जनसुराज्यकडून सरितादेवी हंबीरराव मोहिते यांची सभापतिपदासाठी चर्चा सुरू आहे. त्या घुणकी पंचायत समिती सर्वसाधारण (स्त्री) जागेवरून निवडून आल्या आहेत. नागरिकाचा मागास प्रवर्ग (स्त्री) जागेसाठी सभापतिपद आरक्षित आहे. सरितादेवी मोहिते यांनी निवडून आल्यानंतर कुणबी (स्त्री) जातीचा दाखला काढला आहे. त्या जनरल स्त्री जागेवरून निवडून येऊन ओबीसी (स्त्री)चा दाखला काढून सभापतिपदावर दावा सांगत आहेत. २० डिसेंबर रोजी तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी त्यांच्या अर्जावर काय निर्णय घेणार, हे स्पष्ट होणार आहे.

Web Title: Hathkangalet rally for Chair:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.