हातकणंगले लोकसभा मतदार संघ, २०१९ : कोण जिंकेल हातकणंगले; राजू शेट्टींची हॅट्रीक की धैर्यशील मानेंची विजयी सुरुवात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:30 AM2019-05-23T09:30:42+5:302019-05-23T10:40:32+5:30

हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे धैर्य शील माने हे दुसऱ्या फेरीअखेर 12231मतांनी आघाडीवर.  पहिल्या मतमोजमीमध्ये आघाडी. धैर्यशील माने यांना शिवसेनेच्या  धैर्यधील माने यांना 8442 मतांची  आघाडी आहे . 

Hatkanangale Lok Sabha constituency, 2019: Who won the handcuffs; Raju Shetti's hat-trick started with a brave start? | हातकणंगले लोकसभा मतदार संघ, २०१९ : कोण जिंकेल हातकणंगले; राजू शेट्टींची हॅट्रीक की धैर्यशील मानेंची विजयी सुरुवात?

हातकणंगले लोकसभा मतदार संघ, २०१९ : कोण जिंकेल हातकणंगले; राजू शेट्टींची हॅट्रीक की धैर्यशील मानेंची विजयी सुरुवात?

googlenewsNext
ठळक मुद्दे धैर्यधील माने यांना 8442 मतांची आघाडीराजू शेट्टी 5500 मतांनी पिछाडीवरखासदार राजू शेट्टी पिछाडीवर

हातकणंगले : कोल्हापूर मतदारसंघाप्रमाणेचे जवळच असलेलाला हातकणंगले हा देखिल मतदार संघ राज्यभर गाजत आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणून परिचित असलेल्या महायुती पुरस्कृत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असून यंदा ते हॅट्रीक साधणार का याकडे लक्ष आहे. मोदी लाट असतानाही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी सलग दुसरा विजय मिळविला होता. राजू शेट्टी यांना ६ लाख ४० हजार ४२८ इतकी मत मिळाली होती. ते १ लाख ७७ हजार ८१० मताधिक्यांनी विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाआण्णा आवाडे यांचा पराभव केला होता. आवाडे यांना ४ लाख ६२ हजार ६१८ इतकी मत मिळाली होती.


या मतदार संघात राजकीय क्षेत्रातील अनुभव, भाजपविराधी घेतलेली आक्रमक भूमिका व शेतकऱ्यांचे नेते म्हणून राजू शेट्टी यांची विशेष ओळख आहे, दुसºया बाजूला शिवसेनेकडून तरूण नवीन चेहरा व तसेच राजकीय घराणेशाहीचे पाठबळ यामुळे धैर्यशील माने यांनीही हातकणगंले मतदार संघावर हक्क दाखविला आहे. त्यामुळे नवीन चेहरा की अनुभवी राजू शेट्टी यासाठी हातकणंगले मतदार संघाचा कौलही महत्वाचा असून यात सरस कोण ठरणार आहे हे काही तासातच समजणार आहे.

यंदाच्या निवडणुकीतही महाआघाडीचे राजू शेट्टी यांची विचारधारा, कार्यप्रणाली व महाआघाडीच्या नेत्यांचे मिळणारे पाठबळ व सदाभाऊ खोत यांच्यातील दुफळी यामुळे शेट्टी यांची ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली आहे. दुसºया बाजूला शिवसेनेकडून मिळालेला नवा चेहरा व तरुण नेतृत्व तसेच भाजप व शिवसेना युतीमुळे धैर्यशील माने यांनाही मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे अवघ्या काही तासातच हातगणंगलेला धैर्यशील माने हा तरुण नेता मिळणार की अनुभवी नेते राजू शेट्टी यांची वर्णी लागणार हे समजणार आहे. पुढील राजकीय घडामोडींसाठी यातील विजेता नेता महत्वाचा ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सकाळी सुरुवात झाली यात हातकणंगले मतदार संघातील, राजू शेट्टी पिछाडीवर असून दुसऱ्या फेरी अखेर 3500 मताची  आघाडी मिळाली आहे. पहिल्या मतमोजमीमध्ये आघाडी. धैर्यशील माने यांना शिवसेनेच्या  धैर्यधील माने यांना 8442 मतांची  आघाडी आहे

गेल्या निवडणुकीत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना ६ लाख ४० हजार ४२८ इतकी मत मिळाली होती. काँग्रेसचे कल्लाप्पाआण्णा आवाडे यांना ४ लाख ६२ हजार ६१८ इतकी मत मिळाली होती. या निवडणुकीत एकूण १७ लाख ६५ हजार ७४४ इतके मतदान झाले आहे.

 

 

 

Web Title: Hatkanangale Lok Sabha constituency, 2019: Who won the handcuffs; Raju Shetti's hat-trick started with a brave start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.