हातकणंगले तालुका , निवडणुकीपूर्वी राजकीय हवा तापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:48 AM2017-12-09T00:48:07+5:302017-12-09T00:50:06+5:30

हातकणंगले : नेते तितके पक्ष आणि आघाड्या याप्रमाणे तालुक्याचे राजकारण प्रत्येक नेत्याभोवती फिरत असून, निवडणुका अद्याप वर्ष-दीड वर्षावर असल्या तरी आतापासूनच राजकीय हवा तापायला सुरुवात झाली

Hatkanangale taluka, political winding began before the elections | हातकणंगले तालुका , निवडणुकीपूर्वी राजकीय हवा तापली

हातकणंगले तालुका , निवडणुकीपूर्वी राजकीय हवा तापली

Next
ठळक मुद्देशिवसेनेत गटबाजी, कॉग्रेसमध्ये दुफळी, भाजप ‘जनसुराज्य’च्या विलीनीकरणाच्या हालचाली

दत्ता बिडकर।
हातकणंगले : नेते तितके पक्ष आणि आघाड्या याप्रमाणे तालुक्याचे राजकारण प्रत्येक नेत्याभोवती फिरत असून, निवडणुका अद्याप वर्ष-दीड वर्षावर असल्या तरी आतापासूनच राजकीय हवा तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या हातकणंगले भेटीने शिवसैनिक रिचार्ज झाले तरी गटबाजी मात्र कायम आहे.

काँग्रेस (आय)चे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या कोल्हापूर दौºयामध्ये तालुका काँग्रेसमधील दुफळी उफाळून आली, तर भाजप आणि ‘जनसुराज्य’च्या विलीनीकरणाच्या हालचाली मुख्यमंत्र्यांच्या वारणा भेटीने गडद झाल्या. ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची राजकीय जवळीक भाजपसह इतरांची डोकेदुखी वाढविणारी आहे. मात्र, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजकीय गुगली आणि माजी खासदार निवेदिता माने यांची राष्ट्रवादीतील सक्रियता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने उदंड झाले पक्ष आणि मोकाट सुटतील नेते, अशीच राहणार आहे.

आगामी वर्षभरामध्ये कोणत्याही निवडणुका नाहीत; मात्र आतापासूनच तालुक्यामध्ये राजकीय हवा तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा हातकणंगले येथील धावता दौरा शिवसैनिकांना रिचार्ज करणारा ठरला असला तरी आमदार आणि जिल्हाप्रमुख अशी गटबाजी लपून राहिली नाही. भाजपनेही तालुक्यामध्ये ‘जनसुराज्य’ला बरोबर घेतले आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनी माजी आमदार राजीव आवळे यांना पाठबळ देण्यासाठी भाजपची सर्व ताकद त्यांच्या मागे उभा करण्याचा प्रयत्न चालविला आहे. कोल्हापूर दौºयावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वारणा दौºयामुळे भाजप आणि जनसुराज्य विलीनीकरणाची चर्चा जोरात आहे.

काँग्रेस (आय)चे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या कोल्हापूर दौºयामध्ये माजी खा. जयवंत आवळे यांनी उघडपणे केलेल्या तक्रारीने तालुक्यामधील गटबाजी स्पष्ट झाली आहे. आवाडे आणि आवळे यांचे इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभेचे राजकारण काँग्रेसला दोन्ही मतदारसंघांतून संपविण्यास कारणीभूत ठरले आहे. आवाडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नवीन कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी तयार करून निवडणुका लढविल्या आणि यामुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झाली

राजू शेट्टी, प्रकाश आवाडे जवळीक : भाजप-जनसुराज्यला त्रासदायक
तालुक्याच्या बदलत्या राजकीय संदर्भानुसार स्वाभिमानी पक्षाचे खा. राजू शेट्टी यांनी भाजपची साथ सोडली. याचा फायदा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी उचलून खा. राजू शेट्टी यांच्याबरोबर आवाडे यांनी जवळीक वाढवत भाजपबरोबर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविली आहे. तालुक्याच्या आगामी राजकीय निवडणुकीमध्ये आवाडे आणि शेट्टींची गट्टी जमण्याची शक्यता असून, तसे झाल्यास काँग्रेस, शिवसेना आणि भाजप-जनसुराज्यला ही धोक्याची घंटा आहे

२ तालुक्याच्या राजकारणामध्ये वेगळा असलेला माजी आ. महादेवराव महाडिक यांचा गट ऐनवेळी कोणती राजकीय गुगली टाकणार हे स्पष्ट नसले तरी महाडिक यांना धड भाजप जमेला धरत नाही आणि धड काँग्रेसही जमेला धरत नसल्यामुळे महाडिक कोणाचे हे समजत नाही. कारण महाडिक नेहमी जिंकणाºया घोड्यावर स्वार होऊन राजकारण करीत आले असल्यामुळे महाडिक यांचे राजकारण फिरत्या ढालीप्रमाणे झाले आहे

३ माजी खा. निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चापासून आपली सक्रियता वाढविली आहे. निवेदिता माने आणि सत्त्वशील माने यांची तालुका मोर्चाला असलेली उपस्थिती राष्ट्रवादीला बळ देणारी आहे. मात्र, धैर्यशील माने यांची खासदार संभाजीराजे यांच्याबरोबर असलेली सलगी आणि आ. सुरेश हाळवणकर आणि भाजप जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांच्याबरोबर असलेली सलगी पाहता माजी खासदारांच्या घरात दोन गट असल्याची चर्चा आहे.

 

Web Title: Hatkanangale taluka, political winding began before the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.