हातकणंगले लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेचा राजू शेट्टी यांना धक्का; ध्यैर्यशील माने आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:42 PM2019-05-23T12:42:03+5:302019-05-23T12:58:34+5:30

Hatkangale Lok Sabha Election Results 2019 सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत अंतिम टप्प्यात चुरशीची झाली होती.

Hatkangale Lok Sabha Election 2019 live result Raju shetty trails vs Dhairyshil Mane shivsena Candidate  | हातकणंगले लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेचा राजू शेट्टी यांना धक्का; ध्यैर्यशील माने आघाडीवर

हातकणंगले लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेचा राजू शेट्टी यांना धक्का; ध्यैर्यशील माने आघाडीवर

googlenewsNext

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार व खासदार राजू शेट्टी यांची लोकसभेला विजयाची हॅट्ट्रिक करण्यापासून शिवसेनेने रोखलं आहे. शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी शेट्टी यांना कडवं आव्हान दिले आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’ने अस्लम सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात दलित व मुस्लीम मतांचेही चांगले प्रमाण आहे. ही मते सय्यद यांनी घेतल्यास शेट्टी यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही लढत अंतिम टप्प्यात चुरशीची झाली होती. 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे आत्तापर्यंत झालेल्या फेरीमध्ये राजू शेट्टी यांना 1 लाख 23 हजार 147 मते पडली आहेत तर शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्या पारड्यात 1 लाख 63 हजार 876 मते पडली आहेत तर सय्यद यांनी 34 हजारच्या आसपास मते घेतली आहेत. 

शेट्टी यांची आतापर्यंतची ही पाचवी निवडणूक आहे.परंतु आता ही निवडणूक नक्कीच एवढी सोपी राहिलेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मोदी बेदखल करीत असल्याच्या रागातून भाजप आघाडीतून शेट्टी बाहेर पडले व तेव्हापासून ते मोदी यांच्यावर बोचरी टीका करीत आहेत. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात सर्व पातळ्यांवर तयारी करून शेट्टी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. इचलकरंजी शहरात पाणीप्रश्नाचे भांडवल करून शेट्टी यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऊस आंदोलनात शेट्टी यांनी कारखानदारांशी उभा दावा मांडला; परंतु ‘आता काँग्रेसच्या आघाडीत जाऊन तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसला?’ असा मुद्दा उपस्थित केला जात होता. 
 

Web Title: Hatkangale Lok Sabha Election 2019 live result Raju shetty trails vs Dhairyshil Mane shivsena Candidate 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.