पाण्याचा वेढा पडणाऱ्या गावांच्या मदतीसाठी यंत्रणा तयार ठेवा : रेखावार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 06:33 PM2021-07-20T18:33:40+5:302021-07-20T18:37:04+5:30

Kolhapur Flood collcator : सध्या जिल्ह्यात पाऊस चांगला होत असून अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असलेल्या गावांना मदत पोहोचवण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार ठेवा. बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांना आधीच सुचना द्या, त्यांच्यासाठी पुरेसे अन्नधान्य व औषधसाठा उपलब्ध ठेवा, एकही जनावर वाहून जाऊ नये असे काटेकोर नियोजन करा, छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य, ओला व सुका चारा, औषधसाठा तयार ठेवा अशा सुचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मंगळवारी दिल्या.

Have a system in place to help flood-prone villages: Line by line | पाण्याचा वेढा पडणाऱ्या गावांच्या मदतीसाठी यंत्रणा तयार ठेवा : रेखावार

पाण्याचा वेढा पडणाऱ्या गावांच्या मदतीसाठी यंत्रणा तयार ठेवा : रेखावार

Next
ठळक मुद्देपाण्याचा वेढा पडणाऱ्या गावांच्या मदतीसाठी यंत्रणा तयार ठेवा : रेखावार संभाव्य पुरस्थिती आढावा बैठकीत सुचना

कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात पाऊस चांगला होत असून अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असलेल्या गावांना मदत पोहोचवण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार ठेवा. बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांना आधीच सुचना द्या, त्यांच्यासाठी पुरेसे अन्नधान्य व औषधसाठा उपलब्ध ठेवा, एकही जनावर वाहून जाऊ नये असे काटेकोर नियोजन करा, छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य, ओला व सुका चारा, औषधसाठा तयार ठेवा अशा सुचना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी मंगळवारी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित संभाव्य पूरपरिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, पावसाळ्याच रस्ते व पूल पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा होतो, त्या परिस्थितीतही काही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात व अपघाताची शक्यता असते त्यामुळे पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेटस लावून बंद करावेत, व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. जिल्ह्यातील पाझर तलाव सुस्थितीत असल्याची खात्री करा.

महावितरण विभागाने आवश्यक साहित्याची देखभाल, दुरुस्ती करुन घ्यावी. गरजेनुसार मनुष्यबळ व अधिकचे साहित्य तयार ठेवावे. अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ तयार ठेवा.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, पुरबाधित गावात महसूल, पोलीस, आरोग्य व अन्य संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना लगेच मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी केलेल्या तयारीची माहिती दिली.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी जिल्हा प्रशासनाच्यवतीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली. तसेच महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, कृषी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महावितरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाने केलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.



 

Web Title: Have a system in place to help flood-prone villages: Line by line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.