फेरीवाला धोरणाची सुरुवात लवकरच : बलकवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 10:30 AM2021-02-17T10:30:33+5:302021-02-17T10:34:31+5:30
Muncipal Corporation KolhapurNews- कोल्हापूर शहरातील फेरीवाले, विक्रेत्यांना न्याय देण्याची आपली भूमिका असून वारंवार त्यांच्यावर कारवाई करणे अयोग्य आहे म्हणूनच राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कोल्हापूर : शहरातील फेरीवाले, विक्रेत्यांना न्याय देण्याची आपली भूमिका असून वारंवार त्यांच्यावर कारवाई करणे अयोग्य आहे म्हणूनच राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचा यापूर्वीही प्रयत्न झाला, परंतु त्यात काही कारणांनी अडथळे आले. पहिल्या टप्प्यात फेरीवाले, विक्रेत्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. वारंवार आवाहन करूनही बायोमॅट्रीक कार्ड घेण्यास ६६०० फेरीवाले आले आहेत. मी स्वत: त्यांना दोनवेळा संधी दिली. आता जे सर्वेक्षण झाले आहे, त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता प्रक्रिया सुरू केली जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले.
फेरीवाला धोरणाचा भाग म्हणून प्रथम फेरीवाला समिती गठीत केल्या जातील, या समितीमार्फत त्या त्या भागांतील फेरीवाला झोन व ना फेरीवाला झोन निश्चित केले जातील. फेरीवाल्यांनी त्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. एकदा कायमचे पुनर्वसन झाले पाहिजे, या भावनेने सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.