कारवाईला विरोध करण्यासाठी फेरीवाले आज महापालिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:22 AM2021-02-08T04:22:26+5:302021-02-08T04:22:26+5:30

कोल्हापूर : महापालिका शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणार आहे. ही कारवाई जिल्हा फेरीवाला कृती समितीसाेबत बैठक घेतल्याशिवाय तसेच ग्रामविकास ...

The hawkers are in the municipal corporation today to oppose the action | कारवाईला विरोध करण्यासाठी फेरीवाले आज महापालिकेत

कारवाईला विरोध करण्यासाठी फेरीवाले आज महापालिकेत

Next

कोल्हापूर : महापालिका शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणार आहे. ही कारवाई जिल्हा फेरीवाला कृती समितीसाेबत बैठक घेतल्याशिवाय तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनानंतरच करावी, या मागणीसाठी आज (सोमवारी) सकाळी १० वाजता हजारो फेरीवाले महापालिकेत येणार आहेत.

महापालिकेच्यावतीने सोमवारपासून अतिक्रमणावर कारवाई सुरु करणार आहे. या पार्श्वभूमीवर कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी महाराणा प्रताप चौकात फेरीवाल्यांची बैठक झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने महापालिकेत जावून कारवाईला विरोध करण्याचा निर्णय झाला. सर्व फेरीवाले सकाळी ९ वाजता शिवाजी चौक येथे एकत्र जमून नंतर महापालिकेत येणार आहेत. यावेळी माजी महापौर नंदकुमार वळंजू, अशोक भंडारे, राजेंद्र महाडिक, किरण गवळी, विजय नागावकर, समीर नदाफ, महंमदशरीफ शेख, रियाज कागदी, प्र. द. गणपुले, दिलीप पवार आदी उपस्थित हाेते.

Web Title: The hawkers are in the municipal corporation today to oppose the action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.