रस्ते विकास महामंडळाकडून धोकादायक रहदारी मागार्ची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 08:08 PM2017-09-19T20:08:05+5:302017-09-19T20:10:16+5:30
उचगाव, --पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून धोकादायक रहदारी मार्गावर प्राथमिक उपाययोजना
लोकमत न्युज नेटवर्क
उचगाव, --पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून धोकादायक रहदारी मार्गावर प्राथमिक उपाययोजना केल्या जात आहेत.त्याचाच भाग म्हणून आज नॅशनल हायवे अथारिटी आॅफ इंडिया, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, संबधीत महामार्ग संलग्न असलेल्या स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी कागल ते पेठवडगाव पर्यतच्या अपघात प्रवण क्षेत्राची संयुक्तरित्या पाहणी केली.
महामार्गावर वाहतुक सुरळीत व्हावी.महामार्गलगतच्या गावाना जोडणा-या सेवा रस्त्यावर गतीरोधक (स्पीड बेकर्स), लोंखडी बॅरिकेटर्स, रिफलेक्टर, संरक्षक कठडे या सारख्या उपाययोजनांना सुरूवात करण्यात आल्यांची माहिती नॅशनल हायवे अथारिटी आॅफ इंडियाचे पुणे विभागीय वरिष्ठ तात्रिंक महाप्रबंधक पी.डी.दिवाण यांनी दिली.गेले तीन महिने महामार्गावर अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट ) क्षेत्रात अनेक वेळी वाहनधारकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता,महामार्गावर अनेक ठिकाणी ड्रेनेजमधून निघणारे सांडपाणी तसेच बोगदे, सेवा मार्गावरून येणारे पावसांचे पाणी यामुळे रस्त्यावर निसरटपणा निर्माण होऊन वाहनधारकांच्या अपघातात वाढ होऊन वाहतुक कोंडी निर्माण होत होती.
याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,नॅशनल हायवे अथारिटी आॅफ इंडिया व पोलिस प्रशासन यांनी याबाबत अपघात प्रवण क्षेत्रातील स्पॉट वर जाऊन तेथील ,फोटो, व्हीडीओ शुटिंग, आरेखन, रेखाकंन, याव्दारे माहिती संग्रहीत करण्यात केली आहे.त्यानुसार आज तात्रिंक वरिष्ठ महाप्रबंधक पी.डी.दिवाण यांनी आज रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता समाधान पाटील,निवासी उपअभियंता हिंगमिरे,कागल पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक औंदुबर पाटील,गोकुळ शिरगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक युवराज खाडे , गांधीनगर पोलिस स्टेशनचे सपोनि सुशांत चव्हाण,उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सपोनि जगनाथ जाणकर,अविनाश पोवार यांच्यासह स्थानिक रहिवाशी यांची उपस्थिती होती.
उचगाव महामार्गावर व हद्दीत महिन्याला तीन ते चार अपघात होत होते तर मूर्त्यु ही होत होते.पण गेल्या तीन महिन्यात या रस्त्यावर महामार्गावर स्पीड बेकर्स,रॅर्मब्लर बांधल्याने या अपघाताची संख्या कमी झाली आहे. तर हेल्मेट सक्ती केल्यानंतर एकही दुचाकी चालक अपघातात मूर्त्यु झालेला नाही. त्यामुळे आपण गुगल मॅपिंग व्दारे रस्ते विकास महामंडळ यांना सूचना केल्या त्यांनी अमलबजावणी केली त्यामुळे या ठिकाणी अपघात रोखण्यास मदत झाली आहे.
सपोनि सुशांत चव्हाण गांधीनगर पोलीस ठाणे