कावळाच बनला त्याचा जिवाभावाचा सखा,तो’ अंगाखांद्यावर बागडतो अन् त्यानेच चारलेला खाऊ खातो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:47 AM2018-04-10T00:47:19+5:302018-04-10T01:00:28+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : झाडाची फांदी तोडल्यामुळे मायेच्या उबेला पोरका झालेल्या कावळ्याच्या पिलांना, त्यानं सजिवातील माणुसकी दाखवत घरी आणलं.

He became the crow, his soul-hearted person, he runs on the limbs and eats the food he has eaten. | कावळाच बनला त्याचा जिवाभावाचा सखा,तो’ अंगाखांद्यावर बागडतो अन् त्यानेच चारलेला खाऊ खातो

कावळाच बनला त्याचा जिवाभावाचा सखा,तो’ अंगाखांद्यावर बागडतो अन् त्यानेच चारलेला खाऊ खातो

Next
ठळक मुद्देपोर्ले तर्फ ठाणेतील पक्षिमित्राची अनोखी कथा‘

सरदार चौगुले ।
पोर्ले तर्फ ठाणे : झाडाची फांदी तोडल्यामुळे मायेच्या उबेला पोरका झालेल्या कावळ्याच्या पिलांना, त्यानं सजिवातील माणुसकी दाखवत घरी आणलं. त्या पिलांचे पोटच्या पोरासारखं संगोपन केलं; पण तिघा भावंडांपैकी दोघेजण पंख फुटल्यावर आकाशात भरारी घेऊन आपल्या दुनियेत निघून गेले, तर एकजण त्याच्या अंगाखांद्यावर बागडतो आणि त्यानेच अन्नाचे घास चारले तर खातो, नाहीतर उपाशी राहतो. ही कहाणी आहे माणसाळलेल्या कावळ्याची. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील युवराज शेवाळे या पशुपक्ष्यांशी ऋणानुबंध जोडणाऱ्या अवलियाची.

माणसाला आवड किंवा छंद कधीच स्वस्त बसू देत नाही. लहानपणापासून पशुपक्ष्यांबाबत ओढ असणाºया युवराजने खासगी नोकरी सोडून प्रपंचासाठी पशुपालनासोबत पक्षीसंगोपन केले. युवराजच्या मनावर संसाराचा कितीही ताण असला तरी कावळ्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर युवराजला समाधान मिळते. दोघांना एकमेकांची भाषा समजत नसली तरी हावभावातून जिव्हाळ्याचे संबंध आणखी घट्ट होताना दिसत आहे.

दोन महिन्यांपूर्वी युवराज कोल्हापूरहून गावाकडे येत होता. कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील चिखली फाट्याजवळ वडाच्या तुटलेल्या फांदीत कावळ्याच्या घरट्यात तीन पिलांचा मायेच्या उबेसाठीचा किलबिलाट ऐकून त्यांना घरी आणलं. चोची वर करून भुकेसाठी व्याकूळ झालेल्या पिलांना बोटाने कावळ्याची चोच बनवून त्यांच्या पोटात अन्नाचा घास ढकलावा लागत होता. कावळ्याच्या पिलांचे कुटुंबातील सदस्याप्रमाणे संगोपन करण्यात शेवाळे कुटुंब वेळ देत होते. बघता बघता दोन महिन्यांत कावळ्याची पिल्ली मोठी झाली अन् पंख फुटल्याने आकाशात गगनभरारी घेऊ लागली.

एक दिवशी तीन कावळ्यांपैकी दोन कावळे भावंडाला सोडून आपल्या जगात भूर्रकन उडून गेले; पण आपल्याला दिलेल्या मायेची जाणीव ठेवून त्यातील एक कावळा सध्या शेवाळे कुटुंबाचा अविभाज्य घटक बनून राहिला आहे. तो कावळा युवराजच्या हाताने अन्न खातो आणि दिवसरात्र परसातील झाडावर वास्तव्यास असतो. त्याला बोलवलं की तो त्याच्या अंगाखांद्यावर बसतो, बागडतो. त्याच्याकडे कानाडोळा केला तर टोचून आपली भावना व्यक्त करतो. त्यांच्या परड्यात झाडाझुडपात या कावळ्यामुळे अनेक पक्ष्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेवाळे कुटुंबात माणसाळलेल्या या कावळ्याचा विषय परिसरात कुतूहलाचा बनला आहे.

कावळ्याबाबत गैरसमजुती
माणसाच्या दशक्रियाविधी दिवशी कावळ्याने पिंडाला शिवले की माणसाचा आत्मा मुक्त होतोे; असे अनुभवी वास्तव आहे. तरीसुद्धा कावळ्यांचे घरावरती दंगा करणे, डोक्यावर कावळा बसणे अथवा चोचीने टोचणे, आकाशाकडे तोंड करून कावकाव करणे अशा अनेक प्रकारच्या कावळ्याच्या कृतीला अपशकुनतेची जोड दिली आहे; पण युवराजच्या अंगाखांद्यावर खेळणाºया कावळ्याच्या वास्तवतेने कावळ्याबाबतच्या अंधश्रद्धेला पूर्णविराम दिला आहे.

Web Title: He became the crow, his soul-hearted person, he runs on the limbs and eats the food he has eaten.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.