मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी उभारली ‘बालवाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:19 AM2019-04-03T11:19:28+5:302019-04-03T11:20:30+5:30

: मूळचे भारतीय; पण गेल्या ५0 वर्षांहूनही अधिक काळ कॅनडात स्थायिक झालेले विश्वास बागल यांनी दिवंगत पत्नी सुलेखा बागल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सानेगुरुजी वसाहत येथे बहुजन समाजातील व मर्यादित उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांकरिता

He has set up 'Balvadi' to repay his motherland loan | मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी उभारली ‘बालवाडी’

 साने गुरुजी वसाहतीमधील सूर्यवंशी कॉलनी येथे विश्वास बागल यांनी उभारलेली ‘रेणुका शिशुविहार’ची सुसज्ज इमारत.

googlenewsNext

कोल्हापूर : मूळचे भारतीय; पण गेल्या ५0 वर्षांहूनही अधिक काळ कॅनडात स्थायिक झालेले विश्वास बागल यांनी दिवंगत पत्नी सुलेखा बागल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सानेगुरुजी वसाहत येथे बहुजन समाजातील व मर्यादित उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांकरिता अगदी अल्प शुल्कात अत्याधुनिक प्रकारची व संस्कारक्षम ‘रेणुका शिशु विहार’ नावाची बालवाडी सुरू केली आहे.

प्रत्येकजण म्हणेल, बालवाडी सुरू केली म्हणजे त्यात काय विशेष आहे; पण बागल यांनी मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी बहुजन समाजातील मुलांना ज्या सुविधा लाखो रुपये खर्चून प्रवेश घेतलेल्या बालवाड्यांमध्ये मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या सुविधा या बालवाडीत दिल्या आहेत. यात प्रत्येक वर्गात आॅडिओ-व्हिडीओ या शैक्षणिक साधनांची सुविधा उपलब्ध केली आहे. यासह शैक्षणिक साधनांची लायब्ररीही तयार केली आहे. या बालवाडीत ७० टक्के इंग्रजी व ३० टक्के मराठी अभ्यासक्रम राबविला आहे. यात बालवाडीत १00 मुले शिक्षण घेत आहेत. त्यात शिशुगटात ४०, तर अडीच ते तीन वयोगटात ३०, तीन ते साडेचार वयोगटात ३० व साडेचार ते साडेपाच वयोगटातही मुले शिक्षण घेत आहेत.

प्रत्येक वर्गात तज्ज्ञ, अनुभवी व मुलांबद्दल आत्मीयता असणारा शिक्षक व सहायक शिक्षक काम करीत आहे. विशेषत: दिवंगत सुलेखा बागल यांचे नातू अमित पाटील यांनी या बालवाडीची वास्तू अशा तºहेने बांधली आहे, की ज्यामुळे प्रशस्त, भरपूर प्रकाश व स्वच्छ खोल्यांचे वातावरण निर्माण झाले आहे; त्यामुळे शिकविणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांनाही शिकताना आवड निर्माण होईल व त्यातून उद्याचे देशाचे भविष्य घडेल, असा विश्वास बागल यांना आहे. या बालवाडीचा कारभार अभियंता असलेले दिगंबर पाटील व मुख्याध्यापिका म्हणून पूर्वश्री हराळे-भोसले पाहत आहेत. ते स्वर्गीय भाई माधवराव बागल यांचे नातू होत. त्यांचा समाजसेवेचा वारसा त्यांनी पुढे नेला आहे.


मी गेल्या ५0 वर्षांत नोकरी शिक्षणानिमित्त युरोपात होते; त्यामुळे आपल्या ज्ञानाचा व पैशाचा येथील बहुजन समाजातील मुलांंना फायदा व्हावा. त्यातून चांगले संस्कारक्षम देशाचे नागरिक घडावेत. म्हणून माझी पत्नी सुलेखा हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ अल्पशुल्कात ही अत्याधुनिक प्रकारची बालवाडी उभारली आहे.
- विश्वास बागल, संस्थापक रेणुका शिशुविहार

 

 

Web Title: He has set up 'Balvadi' to repay his motherland loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.