Kolhapur Crime: जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात पत्नीचा खून केला, अन् मृतदेह घरामागे पुरला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 05:11 PM2023-07-04T17:11:32+5:302023-07-04T17:13:26+5:30

जमिनीवर पडलेले रक्त शेणाने सारवून डाग पुसून टाकले

He killed his wife and buried her body behind the house, Incident at Gajapur in Shahuwadi Taluka of Kolhapur | Kolhapur Crime: जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात पत्नीचा खून केला, अन् मृतदेह घरामागे पुरला

Kolhapur Crime: जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात पत्नीचा खून केला, अन् मृतदेह घरामागे पुरला

googlenewsNext

आंबा : जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ही घटना गजापूरपैकी दिवाणबाग येथे घडली.

शाहूवाडी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, दगडू सखाराम चौगुले (वय ७०) याने शुक्रवारी सायंकाळी पत्नी लक्ष्मी चौगुले (वय ६०) हिच्या मानेवर डोक्यावर व चेहऱ्यावर कोयत्याने वार करून खून केला. खून उघडकीस येऊ नये म्हणून चौगुलेने रात्रीतच घरामागील परसात खड्डा खणून मृतदेह पुरला. सोमवारी मुंबईहून मुलगा गणेश घरी आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. त्याने थेट शाहूवाडी पोलिसांत वडील दगडू चौगुले यांच्याविरोधात खुनाची फिर्याद दिली.

लक्ष्मी यांचे माहेर हेच गाव आहे. त्यांना दोन मुले आहेत. दोघेही मुंबईला नोकरीनिमित्त राहतात. घरी दगडू व लक्ष्मी दोघेच राहतात. दगडू कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करीत होता. शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड तपास करीत असून, दगडू चौगुले याच्याविरोधात ३०२ व २०१ या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास सायंकाळी अटक केली. लक्ष्मी यांचा पुरलेला मृतदेह दुपारी बाहेर काढून आंब्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथेच शवविच्छेदन केले व सायंकाळी अंत्यसंस्कार केले.

शेणाने सारवून डाग पुसून टाकले

लक्ष्मी चौगुले यांच्या शरीरावर वार करताना घराच्या भिंतींवर रक्ताचे सडे आढळले. जमिनीवर पडलेले रक्त शेणाने सारवून डाग पुसून टाकल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सत्तर वर्षीय चौगुले याने उचललेले टोकाचे पाऊल पाहून परिसरातून आश्चर्य अन् संताप व्यक्त होत आहे.

Web Title: He killed his wife and buried her body behind the house, Incident at Gajapur in Shahuwadi Taluka of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.