त्याने चक्क अडवली ऑक्सिजनवाहक बस, तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 08:28 PM2021-05-11T20:28:41+5:302021-05-11T20:30:35+5:30
Crimenews Kolhapur : कोरोनाचा संसर्ग वाढताना तोंडावरील मास्क काढण्याचे आवाहन करत नागरिकांची दिशाभूल करणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. या दरम्यान त्या माथेफिरूने चक्क ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या केएमटी बसला अटकाव केला. कर्मचाऱ्यांना मास्क काढायला लावला. असे कृत्य करणाऱ्या आणि त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर टाकणाऱ्या सुहास गणेश पाटील (वय ३०, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर, रिंगरोड) याला मंगळवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढताना तोंडावरील मास्क काढण्याचे आवाहन करत नागरिकांची दिशाभूल करणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. या दरम्यान त्या माथेफिरूने चक्क ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या केएमटी बसला अटकाव केला. कर्मचाऱ्यांना मास्क काढायला लावला. असे कृत्य करणाऱ्या आणि त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर टाकणाऱ्या सुहास गणेश पाटील (वय ३०, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर, रिंगरोड) याला मंगळवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.
कोल्हापूर शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढता मृत्यू दरही चिंताजनक आहे. त्यासाठी शहरातील दवाखाने आणि कोविड सेंटरसाठी ऑक्सिजनची वाढती गरज ओळखून कोल्हापूर महापालिकेने ऑक्सिजन पुरवठा करणारी बस तैनात केली. चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली ही बस २४ तास कार्यरत ठेवली आहे.
शनिवारी दुपारी सानेगुरुजी वसाहतीकडून क्रशर चौकाकडे ही बस येत होती. चौकानजीक रस्त्यात खोदकाम केल्याने ही बस वनवे मार्गावरून जाताना सुहास पाटील या माथेफिरूने आपली दुचाकी आडवी मारून बस रोखली. ती पुन्हा मागे घेण्यास भाग पाडली. वन वे तून पुन्हा यायचे नाही अशी मग्रुरीची भाषा वापरली, तसेच त्या बसवरील विनंती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही रोखले. त्या कर्मचाऱ्यांच्या तोंडावरील मास्क आपल्या हाताने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला.
खाक्या दाखवताच भूमिका बदलली
तत्पूर्वी, सुहास पाटील याने रस्त्याकडेला बसलेल्या एका महिलेलाही कोरोना अस्तित्वात नसल्याचे सांगून त्यांचा मास्क काढण्यास भाग पाडले. चुकीचा संदेश पसरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला, तर मंगळवारी दुपारी त्याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, त्याला पोलिसांनी ह्यखाक्याह्ण दाखवताच त्याने आपली भूमिका बदलत मास्क तोंडावर घालण्याचे आवाहन केले.