दीड महिन्याने कोल्हापूरला परत येणार, सगळी तयारी झाली पाहिजे; अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:25 AM2023-02-20T11:25:11+5:302023-02-20T11:25:46+5:30

‘बूथ जिता, तो चुनाव जिता’ असे सांगून शाह यांनी यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टींचा ऊहापोह करताना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

He will return to Kolhapur in a month and a half, all preparations should be done; Amit Shah order to BJP workers | दीड महिन्याने कोल्हापूरला परत येणार, सगळी तयारी झाली पाहिजे; अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश

दीड महिन्याने कोल्हापूरला परत येणार, सगळी तयारी झाली पाहिजे; अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश

googlenewsNext

कोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेला जिंकण्यासाठी बूथ, शक्ती केंद्र, संपर्क आणि प्रवास यांवर भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित करावे. मी दीड महिन्याने पुन्हा येणार असून यावेळी सर्व तयारी झालेली हवी, असे सांगत भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी संध्याकाळी भाजप कार्यकर्त्यांचा तास घेतला.

भाजपची जाहीर सभा झाल्यानंतर शेजारीच असलेल्या भाजपच्या नूतन कार्यालयामध्ये त्यांनी सुमारे ३५ मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘बूथ जिता, तो चुनाव जिता’ असे सांगून शाह यांनी यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टींचा ऊहापोह करताना अल्पसंख्याक समाजाशी संपर्क वाढवणे, त्यांना शासनाच्या योजना सांगणे, त्यांचा लाभ मिळवून देणे आणि शासकीय योजना सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

शाह म्हणाल्या, कृषिसेवा संस्था स्थापन करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. त्या माध्यमातून घराघरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा. संपर्कासाठी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू नका.

लोकसभा प्रवास योजनेचे संयोजन बाळा भेगडे यांनी स्वागत केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, शिवप्रकाश, मकरंद देशपांडे, आमदार गोपीचंद पडळकर, सुरेश हाळवणकर, समरजित घाटगे, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याआधी उत्तम कांबळे आणि प्रा. शहाजी कांबळे यांनी शहा यांचे स्वागत केले.

उभे करून विचारणा

यावेळी शाह यांनी शाहूवाडी मतदारसंघातील मंडल अध्यक्ष सचिन शिपुगडे यांना उभे करून बूथविषयक माहिती विचारली व त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली.

युवकाचा गोंधळ

शाह यांची बैठक आत सुरू असताना बाहेर रस्त्यावर त्यांना भेटण्यासाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील वांगी येथील एका युवकाने आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत आरडाओरडा सुरू केला. तो सध्या वाघोली येथे राहतो. मात्र त्याला पोलिसांनी तातडीने बाजूला नेले.

शाह रवाना, फडणवीसांचा मुक्काम

या बैठकीनंतर शाह हे विमानाने दिल्लीला रवाना झाले; तर फडणवीस हे भोजनासाठी खासदार महाडिक यांच्या घरी गेले. तेथून ते हॉटेलवर परतले. या ठिकाणी गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

Web Title: He will return to Kolhapur in a month and a half, all preparations should be done; Amit Shah order to BJP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.